सांगली – ज्योती मोरे
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक आठ मधील गजानन महाराज हाउसिंग सोसायटीसह सिद्धिविनायक हाउसिंग सोसायटीतील रस्त्यांच्या हॉट मिक्स कामास आज महापौर दिग्विजय सूर्यवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांच्यासह नगरसेवक विष्णू माने यांच्या हस्ते आणि प्रभागातील नागरिकांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. दरम्यान सदर प्रभागातील ड्रेनेज, गटारीसह इतरही कामे पूर्ण करण्याचा महापौरांच्या साथीने प्रयत्न करणार असल्याचे अश्वासन नगरसेवक विष्णू माने यांनी यावेळी बोलताना दिले.