नरखेड – आज दि. 12/12/22 ला प्राथमिक आरोग्य केंद्र भिषणूर येथे सिकलसेल सप्ताह चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी दि.11डिसेंबर ते 17डिसेंबर या कालावधीत सिकलसेल नियंत्रणाकरिता राबवावयाच्या विविध उपाययोजनांची व शासकिय उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना व नागरिकांना देण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री सतीशजी रेवतकर माजी सदस्य पं स नरखेड हे होते. यावेळी डॉ उमेश देशमुख वै. अधि. भिषणूर यांनी व डॉ पूजा कदम यांनी सिकलसेल बाबत सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली, यावेळी गोवर साथ प्रसार व नियंत्रण याबाबत मार्गदर्शन करण्यात येऊन गोवर आजाराच्या प्रतिबंधाकरिता करावयाच्या उपाययोजनांचे बॅनर चे अनावरण पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले,
यावेळी सर्वांनी शासकिय योजनेचा लाभ घेऊन सिकलसेल चाचणी मोफत करुन घेण्याचे आवाहन श्री सतीशजी रेवतकर यांनी केले, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ यादव, डॉ डांगोरे, डॉ सुरभी सिंग , नारनवरे सर, दुर्गा घारपुरे मॅडम, राऊत सिस्टर, श्री मोवाडे, टीक्कस, लहवाळे, हिम्मत वंजारी, श्रीमती आघाव, श्रीमती घोरसे, आरोग्य कर्मचारी व आशा उपस्थीत होते.
यावेळी श्री बलराम कौशल प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांनी 54 लाभार्थ्यांची सिकलसेल तपासणी केली त्यात 6 लाभार्थी संशयित आढळले असून त्यांच्या पुढील तपासण्या प्रा आ केन्द्र भिषणूर तर्फे करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे संचालन डॉ, कृतिका पेठे यांनी केले तर श्रीमती राउत यांनी आभार प्रदर्शन केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री नेहाल, गौरव, नितेश, राहुल, ललित, सिद्धार्थ, श्रीमती रंजना, श्रीमती संगीता यांनी परिश्रम घेतले.