Monday, December 23, 2024
Homeविविधपातूर | आई-वडिलांना पोरक्या झालेल्या भावंडांना मिळाला मायेचा सहारा..!

पातूर | आई-वडिलांना पोरक्या झालेल्या भावंडांना मिळाला मायेचा सहारा..!

पातूर – निशांत गवई

पातुर येथील सामाजिक कार्यकर्ते कालकथित समाधानजी बोरकर यांचे सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असलेले पुत्र वनराई गौरक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत बोरकर यांनी यांनी बार्शीटाकळी तालुक्यातील टिटवन  येथे राहणाऱ्या अनाथ मुलांना मायेचा आधार दिला. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आई-वडिलांच स्थान हे सर्वात उंच आहे. त्यांच्या शिवाय जगणं हे काय असतं हे केवळ त्या मुलांनाच माहीत.

दोन्हीही पंख आई वडील नावाचे मुलांच्या आयुष्यामध्ये महत्त्वपूर्ण असतात, पण त्यातील एकही पंख नसले तर मुलांचा होणारा वनवा याची कल्पना न केलेलीच बरी, या सामाजिक जाणीव मधून या अनाथ मुलांच्या बाबत पेपरला बातमी वाचून यांचे पालकत्व स्वीकारणारे श्रीकांत बोरकर यांनी समाजामध्ये पुन्हा नव्याने दातृत्वाची भूमिका नव्याने सिद्ध केली.

टिटवण येथे राहणारे या मुलांचे वडील प्रल्हाद तुळशीराम शेळके यांचे निधन दिनांक 26 जुलै 2020 रोजी झाले असून, त्याच पाठोपाठ मुलांची आई सुनीता प्रल्हाद शेळके या 1 फेब्रुवारी 2023 रोजी जग सोडून गेल्या. आई-वडिलांचा आधार हरवलेल्या मंगेश हा बारावी मध्ये असून सावित्री दहावीला आहे तर राधिका ही वर्ग आठव्या मध्ये असून तिन्ही भावंड शिक्षण घेत असून त्यांना कुठल्याही जीवन जगण्याचा आधार नाही,

याबद्दल भावंडांना मदत करण्यासाठी सदर बातमी पेपरामध्ये प्रकाशित झाली .सदर बातमी वाचून पातुर येथील रहिवासी श्रीकांत बोरकर यांनी तिन्ही मुलांना समज येईपर्यंत मुलांचे पालकत्व स्वीकारले. या आधी सुद्धा त्यांनी देऊळगाव येथील तीन मुलांचे पालकत्व स्वीकारून त्या 4 भावंडांपैकी दोन बहिणीचे लग्न करून दोन भावांचा समजेपर्यंत सांभाळ केला. पुन्हा तिथेच पुन्हा न थांबता टिटवण येथील येथील या तीन भावंडांना आपले करून मायेचा आधार दिला.

समाजामध्ये विविध माध्यमातून विविध कृती मधून आपले ओळख निर्माण करणारे श्रीकांत बोरकर यांनी या कृतीमधून पुन्हा नव्याने नवीन कार्याची समाजाला अनुभूती दिली त्यांच्या या दातृत्वाची समाजामध्ये कौतुक  होते. श्रीकांत बोरकर यांचा वसा समाजातील प्रत्येक घटकाने आपल्या आपल्या परीने शक्य तस्या प्रकारे घेतल्यास या समाजामध्ये कोणत ही बालक अनाथ असणार नाही हेच या ठिकाणी मनावर असे वाटते.

अनाथ मुलांना अनाथ मुलांचे स्वीकारलेले पालकत्व यामुळे श्रीकांत बोरकर यांचे सामाजिक स्तरातून कौतुक होत आहे. या वेळी प्रामुख्याने अकोला येथिल् संजय लाड , आगिखेद् येथील प्रकाश लान्द्कर , दगड परवा येथील निलेश इंगळे , मुलांचे मामा श्री तिवाले आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: