खामगाव – हेमंत जाधव
आज गुढीपाडवा, आज पासून मराठी नव वर्षाला सुरुवात झाली असून विश्व हिंदू परिषद बजरंग दल श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने आजपासून श्रीराम नवमी पर्यंत श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. भगव्या पताका लाइटिंग बॅनर यामुळे शहर सजले असून टॉवर चौकात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
सकाळी सर्वप्रथम येथील टावर चौकातील राजीव गांधी उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. यानंतर शहरातील प्रमुख मार्गाने भव्य दुचाकी रॅली निघाली. दुपारी बारा वाजता टॉवर चौकातील उद्यान येथील अयोध्या धाम मध्ये मंत्रोपचारात पूजा अर्चना करून प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या ठिकाणी रोज विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.
तर आज सायंकाळी सात वाजता ढोल पथकाच्या निनादात भगवे पताका फडकवून नववर्षाची स्वागत केले जाणार आहे. 30 मार्च रोजी श्रीराम नवमीला शहरातून भव्य शोभायात्रा निघणार असून या शोभायात्रे व श्रीराम जन्मोत्सवात नागरिकांनी जात-पात, पंत, पक्षभेद विसरून सहभागी व्हावे असे आवाहन श्री नितीनजी डिडवाणीया अध्यक्ष श्रीराम जन्मोत्सव समिती खामगावच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी उत्सव प्रमुख ऍड अमोल अंधारे श्रीराम जन्मोत्सव समिती उपाध्यक्ष डॉ.भगतसिग राजपूत, श्री नरेश नागवानी,दामोदर पांडे,ऍड उदय आपटे ,सचिव डॉ भास्करराव चरखे विहिंप जिल्हाध्यक्ष राजेश झापर्डे, जिल्हामंत्री राजेंद्रसिह राजपूत,शहराध्यक्ष राजेश मुळीक,रामदल व्यायाम मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत मोहता, श्रीराम समिती सल्लागार प्रसाद तोडकर,राहुल कळमकार, अमोल बगाडे,रवी आनंदे यांची प्रमुख उपस्थिती होती