कार्यक्रमात पार पडणार विविध धार्मिक कार्यक्रम…
रामटेक – राजु कापसे
रामटेक ते मौदा मार्गावर किट्स कॉलेज जवळ असलेल्या शनी मंदीरात श्री शनी जयंती महोत्सव निमित्ताने शनी मंदिर सेवा समीतीच्या वतीने येत्या १८ व १९ मे दरम्यान दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तेव्हा भावीक भक्तगणांनी तन मन धनाने सेवा समपिँत करून या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहण श्री शनी मंदिर सेवा समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.
गुरुवार दिनांक १८ मे ला सायंकाळी ७ वाजता शनी मंदिर सेवा समिती च्या वतीने आरती होणार आहे. यानंतर सायंकाळी ७.३० वाजता श्री अशोकराव हांडे गुरुजी यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर शुक्रवार दि. १९ मे ला सकाळी ७ वाजता अभिषेक व आरती होणार आहे.
या कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन जि.प. सदस्य सतीश डोंगरे हे उपस्थीत राहाणार आहे. यानंतर सकाळी ११ वाजता सार्वजनिक हवन होणार आहे. या कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन श्री ऋषी किंमतकर, सचिव श्री समर्थ शिक्षण संस्था रामटेक डॉ अंशुजा किंमतकर सामाजिक कार्यकर्ता रामटेक हे उपस्थीत राहाणार आहे.
सायंकाळी ७ वाजता महाआरती होणार असुन या कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन श्री हदयनारायण यादव पोलीस निरीक्षक रामटेक हे प्रामुख्याने उपस्थित राहाणार आहेत. सायंकाळी ७.३० वाजता भजन संध्या अंशु म्युझिकल इव्हेंटस ग्रुप व महाप्रसाद होणार आहे तरी कार्यक्रमाचा जास्तीत जास्त भावीक भक्तांनी लाभ घण्याचे आवाहन शनी मंदिर सेवा समिती केलेले आहे. शनी मंदिर सेवा समिती चे अध्यक्ष खेमराज इखार, उपाध्यक्ष राजु गायकवाड, सचिव सुरेश चव्हाण तथा सदस्यगण कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अथक प्रयत्न करीत आहे.