रामटेक – राजु कापसे
रामटेक:- सद्गुरु नारायण स्वामी मंदिरात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी १८ डिसेंबर ते सोमवार २६ डिसेंबर या कालावधीत सद्गुरू नारायण स्वामी महाराज आणि श्री दत्तगुरु बालयोगी छोटूबाबा पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. १८ डिसेंबर रोजी पुण्यतिथी उत्सवाची सांगता साध्वीजी महाराजजींच्या चरणकमळांनी दीप प्रज्वलनाने करण्यात आली.
यानंतर दररोज सकाळी ९ वाजता श्री सदगुरुनाथजींचा अभिषेक होईल,तर सकाळी १०:०० ते दुपारी ४:०० वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप होणार आहे. या कालावधीत २५ डिसेंबर रोजी विविध प्रकारची शिबिरे घेण्यात येणार आहे. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता नारायण स्वामीजींच्या समाधीवर १०८ दीप प्रज्वलित होतील, त्यांचे स्मरण होईल. त्याच दिवशी त्यांनी संजीवन समाधी घेतलेली होती.
तो क्षण आठवून हा सण साजरा केला जातो. २६ डिसेंबर ला सकाळी १० वाजता सद्गुरुनाथांचा महाभिषेक होईल. ओम नमो नारायणाय या अष्टाक्षरी महामंत्राच्या अखंड जपाची समाप्ती होईल. त्यानंतर गोपाळ काला व महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला छत्तीसगड, मध्य प्रदेशातील लोक येतात.त्यामुळे या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.