Monday, December 23, 2024
Homeराज्यश्रीराम प्राणप्रतिष्ठा समारोह च्या पूर्वसंध्येला गड मंदिर रामटेक येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसांकडून...

श्रीराम प्राणप्रतिष्ठा समारोह च्या पूर्वसंध्येला गड मंदिर रामटेक येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसांकडून पंचमहाआरती…

रामटेक – राजू कापसे

प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पूर्वसंधेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडमंदिर रामटेक येथे प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन पंचमहाआरती केली.तत्पूर्वी रामटेक विधानसभा क्षेत्रातील रामभक्त भाजपा परिवार तर्फे ११११दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला.

गडमंदिर परिसर दिव्याच्या रोषणाई आणि पुष्पमालानी सजविण्यात आला होता.उपमुख्यमंत्री यांनी राम,लक्ष्मण,हनुमान मंदीरात जाऊन दर्शन व आरती केली.संपूर्ण राम मंदिर परिसराची पाहणी व मंदिर परिसराची माहिती उपमूख्यमंत्री यांनी घेतली.गोकुळ द्वार सज्ज असलेल्या पंचमहाआरती कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

पंच महाआरती कार्यक्रमाला खासदार कृपाल तुमाने,आमदार आशीष जयस्वाल,माजी आमदार डी.मल्लिकार्जुन रेड्डी,
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डाॅ. राजेश ठाकरे,राहुल किरपान,योगेश वाडीभस्मे,नंदकिशोर कोहळे,उमेश पटले,स्वप्नील खोडे,उमेश कुंभलकर,विशाल चापले, बिरेंदर सिंग,गुरुदेव चकोले,अनुप राजूरकर सह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: