हेमंत जाधव
श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्र, अयोध्या येथे श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा अक्षद वितरण(निमंत्रण) व गृह संपर्क अभियान निमित्त खामगाव येथे आज सोमवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२७ रोजी आगमन होणार असून या कलशाचा भव्य स्वागत सोहळा, पूजा,महाआरती असा कार्यक्रम स्थानिक श्री प्रल्हाद महाराज राम मंदिर, सिव्हील लाईन्स, खामगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
आगामी पौष शुक्ल, द्वादशी, विक्रम संवत् २०८०,सोमवार दि.22 जानेवारी 2024 या शुभदिनी आपले आराध्य दैवत श्री रामलला श्रीक्षेत्र अयोध्या येथील नूतन मंदिरात विराजीत होणार आहेत.
प्राणप्रतिष्ठेच्या ह्या भव्यदिव्य सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी तसेच या निमित्ताने आपल्या राहत्या भागातील मंदिरामध्ये एकत्रित येवुन श्रीरामाचे पूजन व उपासना करण्यासाठी तसेच या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी प्रत्येक मोठ्या मंदिरात टिव्ही स्क्रिन लावण्याचे आवाहन करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने संपूर्ण देशभर दि.01 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या काळात अक्षत वितरण व गृह संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे.
या अनुषंगाने श्री क्षेत्र अयोध्या येथून अक्षतांचा मंगल कलशाचे आपल्या खामगाव नगरीमध्ये सोमवार दि. 27 नोहेंबर 2023 रोजी सायंकाळी ठीक ६ वा. छत्रपती श्री शिवाजी महाराज स्टेडियम,छ.शिवाजी महाराज नगर येथे आगमन होणार आहे.
यानिमित्त छत्रपती श्री.शिवाजी महाराज स्टेडियम पासून भव्य मोटरसायकल रॅली द्वारे नगरातील प्रमुख मार्गाने हा मंगल कलश श्री प्रल्हाद महाराज श्रीराम मंदिर, सिव्हिल लाईन्स येथे पोहोचून त्याठिकाणी कलशाचे पूजन व श्रीराम महाआरती चे आयोजन करण्यात आले आहे. या मोटर सायकल रॅलीचा मार्ग छत्रपती श्री शिवाजी महाराज स्टेडीयम येथून प्रारंभ – अर्जुन जल मंदिर- महावीर चौक- फरशी- श.भगतसिंग चौक- टॉवर चौक- नांदुरा रोड ने जलंब नाका येथून श्री प्रल्हाद महाराज श्रीराम मंदिर येथे समारोप होऊन पुढील कार्यक्रम मंदिरात आयोजित करण्यात आला आहे.
तरी खामगाव नगरातील सर्व हिंदुत्ववादी संघटना, धर्मप्रेमी, श्रीराम भक्त बंधुभगिनींना विनंती पूर्वक नम्र आवाहन करण्यात येते की आपण सर्वांनी या मोटरसायकल रॅलीत सहभागी होवुन तसेच या मंगल कलशाच्या स्वागत, दर्शन,महाआरती व प्रसादासाठी अवश्य उपस्थित रहावे अशी विनंती विश्व हिंदू परिषद व श्री प्रल्हाद महाराज राम मंदिराच्या वतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आलेली आहे.