Thursday, December 26, 2024
Homeसामाजिकश्रीराम हनुमान मिलन भव्य पदयात्रेचे रामनगरीत जल्लोषात स्वागत...

श्रीराम हनुमान मिलन भव्य पदयात्रेचे रामनगरीत जल्लोषात स्वागत…

जय श्रीराम जय हनुमान च्या गजराने दुमदुमली अवघी रामनगरी….भक्तगणांकडुन पदयात्रेची ठिकठिकाणी अल्पोहाराची व्यवस्था

राजु कापसे
रामटेक

मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्याच्या सौंसर तालुक्यातील जामसावळी येथुन दि.२२ मार्चला गुडीपाडव्याच्या दिवशी रामटेक गडमंदीर येथे निघालेली ‘ श्रीराम हनुमान मिलन ‘ ही भव्य पदयात्रा २५ मार्चच्या दुपारी १ च्या सुमारास रामनगरीत दाखल झाली. यावेळी रामटेकवासीयांकडुन या भव्य पदयात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. पदयात्रेत शंभरहून अधिक सदस्य सहभागी होते.

चमत्कारीक श्री हनुमान मंदीर संस्थान, जामसावळी च्या वतीने सदर भव्य पदयात्रेचे आयोजन व नियोजन करण्यात आले होते. जामसावळी ते रामनगरी ( रामटेक ) गडमंदीर असा पदयात्रेचा प्रवास होता. दरम्यान आज दि. २५ मार्चला रामटेक तालुक्याच्या हद्दीमध्ये पदयात्रा पोहोचताच सुरुवातीला मनसर येथे वैष्णवी गृप च्या वतीने पदयात्रेचे स्वागत करण्यात आले व अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली. यानंतर खैरी बिजेवाडा (वाहीटोला) येथे विघ्नहर्ता नवयुवक गणेश मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले व अल्पोहार देण्यात आला. यानंतर शितलवाडी येथील गजानन महाराज मंदीर आवारात चरण पादुकेचे पुजन करण्यात आले व अल्पोहार फराळाची व्यवस्था शितलवाडीवासीयांकडुन करण्यात आली. यावेळी येथे सरपंच मदन सावरकर, उपसरपंच विनोद सावरकर तथा ग्रामवासी उपस्थित होते. यांनतर पदयात्रा दुपारी १ च्या सुमारास प्रख्यात रामनगरीत दाखल झाली. बसस्थानक चौकात अ.भा. गुरुदेव सेवा मंडळ नागपुर व अमोल बालपांडे मित्र परीवार तर्फे पदयात्रेचे स्वागत करण्यात आले व अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली.

यानंतर शहराच्या गांधी चौकामध्ये सृष्टी सौंदर्य मित्र परीवार तथा सितामाई रसोईघर तर्फे पदयात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले व शरबत चे वितरण करण्यात आले. येथुन नंतर पदयात्रेचे श्रीराम गडमंदीर रामटेक कडे प्रस्थान झाले. गडमंदीरावर पुजन व अभिषेक तथा भोजनाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर परमपुज्य श्री अजयजी रामदास महाराज यांच्या उपस्थितीमध्ये यात्रेला मार्गदर्शन तथा आर्शिपणनन झाले. तदनंतर पदयात्रा कार्यक्रमाची सांगता झाली.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: