Monday, December 23, 2024
Homeराजकीयअंबाडा देशमुख ग्रामपंचायत येथे उपसरपंच पदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री नारायण सरियाम...

अंबाडा देशमुख ग्रामपंचायत येथे उपसरपंच पदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री नारायण सरियाम यांची बिनविरोध निवड…

नरखेड – अंबाडा देशमुख येथे नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकित राष्ट्रवादी पक्षाचे श्री नारायण सरियाम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायत सरपंचाची निवड सुद्धा येथे बिनविरोध करण्यात आली होती. अनेक दावेप्रतिदाव्यानंतर सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय नरखेड येथे आज भेट दिली. श्री वैभव दळवी, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नरखेड तालुका व श्री संजय चरडे, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नरखेड शहर यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांचे स्वागत करण्यात आले.

सर्व निवडून आलेले व उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचा राज्याचे माजी गृहमंत्री आदरणीय श्री अनिल देशमुख साहेब व युवा नेते श्री सलील देशमुख जि. प. सदस्य, नागपूर यांच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास असून आम्ही सर्व पूर्वीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असल्याचे माजी सरपंच विठ्ठलराव बोरेकर व नव निर्वाचित उपसरपंच श्री नारायण सरेआम यांनी पत्रकारांना सांगितले व सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दुपट्टे परिधान केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात उपस्थित ग्रामपंचायत उपसरपंच श्री नारायणराव सरीयाम, माजी सरपंच तथा नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य श्री विजयभाऊ गुंजाळ, ग्रा. स. सौ. इंदुबाई कुमरे, ग्रा. स. सौ. सोनुताई रेवतकर, ग्रा. स. सौ. कविताताई फुले व ग्रा. स. सौ. मंजूबाई उईके यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी अंबाडा देशमुख ग्रामपंचायत येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व माजी सरपंच श्री विठ्ठलभाऊ बोरेकर, श्री कृष्णाजी डबरासे, श्री रामभाऊजी सरीयाम, श्री राजेन्द्र रेवतकर, श्री देवपूजारी रेवतकर, श्री विजय धोसेवान, श्री गणेश फुले, श्री माधवराव सरीयाम, श्री कैलाश नेहारे, श्री मनोहर कवडती, श्री गजानन ठाकरे, श्री गणेश धूर्वे व श्री भाविन सरीयाम उपस्थित होते.

यावेळी नरखेड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी श्री जाकीरभाऊ शेख, श्री सचिन चरडे, श्री नानाभाऊ मुलताईकर, प्रा. श्री नरेश तवले, श्री योगेश मांडवेकर, श्री सुशील डोंगरे, श्री अजय सोमकुवर व श्री ईश्वर रेवतकर प्रामुख्याने उपस्थित होते.

भाजपने अंबाडा देशमुख या ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता काबीज केल्याचा दावा केला होता. मात्र आज ७ सदस्य व सरपंच असलेल्या ग्रामपंच्यात मध्ये राष्ट्रवादीच्या गटाचे उपसरपंच यांची अविरोध निवड झाली उपसरपंच व पाच (५) सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे त्यामुळे अंबाडा देशमुख या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे हे सिद्ध झाले.श्री वैभव दळवीकार्याध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नरखेड तालुका

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: