श्री लोहाणा महाजन अमरावती आणि सपना ना वावेतर परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ११ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९:०० ते रात्री उशिरा या कालावधीत ‘राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय युवक-युवती परिचय मेळाव्याचे’ भव्य आयोजन स्थानिक श्री लोहाना महाजनवाडी, बुटी प्लॉट येथे करण्यात आले आहे. या परिचय मेळाव्यासाठी एकूण २५४ नामांकन आले असून २ नामांकन परदेशातून आले आहेत हे उल्लेखनीय.
श्री लोहाना महाजन समिती अमरावती व सपना ना वावेतर परिवार द्वारा आयोजित राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय यवक-युवती परिचय मेळाव्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. ११ ऑगस्ट २०२४ रोजी हा मेळावा स्थानिक श्री लोहाना महाजनवाडी, बुटी प्लॉट येथे पार पडत आहे. श्री लोहाना महाजन समितीचे अध्यक्ष अरुणभाई आडतीया, महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ सरलाबेन तन्ना, नवयुवक मंडळ चे अध्यक्ष जयेशभाई सेठीया आणि कार्यक्रम संयोजक सुरेशभाई वसाणी, सपना ना वावेतर ग्रुपचे मनभाई ठक्कर, चंद्रकांतभाई आडतीया, योगेशभाई जोबनपुत्रा, हेमंतभाई ठक्कर, ललितभाई रायचुरा यांच्यासह संपूर्ण टीम हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नरत आहे.
या कार्यक्रमाच्या नियोजन बैठकीमध्ये १५० नामांकन दाखल करण्याचा उद्देश समितीने समोर ठेवला होता, मात्र या समितीचे पहिले आयोजन असून त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद समाजाचा मिळाला आणि २५४ नामांकन या संमेलनासाठी दाखल झालीत. यामध्ये ६५ मुलींची नामांकन आहेत हे विशेष. या नामांकन केलेल्या सहभागी २५४ युवक-युवतीचा सुंदर फोटोसह संपूर्ण परिचय देणारी परिचय पुस्तिका तयार करण्यात आली आहे. या पुस्तकाचे डिझाईन आणि प्रिंटिंग हे श्री जी ग्राफिक्स चे संचालक निलेशभाई खंडेडिया यांनी केले आहे.
या कार्यक्रमाला उद्घाटन तसेच तयार करण्यात आलेल्या परिचय पुस्तिकाचे विमोचन गुजराती समाज हिंगणघाट चे पूर्व अध्यक्ष हरिभाई चंदाराणा यांच्या हस्ते तसेच विशेष अतिथि श्री लोहाना महापरिषद चे झोनल अध्यक्ष निलेशभाई गढिया (नागपूर), सचिव श्री मनीषभाई गंडेचा आहे.
या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय युवक युवतीनीं परिचय संमेलनामध्ये देश विदेशातून २५४ नामांकन पाठविले आहेत. यामध्ये नागपूर, वर्धा, यवतमाळ, सुरत, अहमदाबाद, राजकोट, रायपुर, इंदोर, अकोला, राजीम, दुर्ग, रांजनगाव, हिंगणघाट, चंद्रपूर, अमरावती, जळगाव जामोद, जळगाव, बडनेरा, गडचिरोली, मुंबई, सुरेन्दनगर, कल्याण, ठाणा, बरोडा, वसई, बोरीवली, धारणि, गोंदिया, पुणे, नाशिक, कालवा, वलसाड, तलालागिर, जालना, हैदराबाद, भिलाई, कराड, नवी मुंबई, जामनगर, बीड, वाशिम, डोंबिवली, नांदुरबार, जामजोधपुर, गोवा आणि उल्लेखनीय परदेशातून दोन नामांकन दाखिल झालेत ते जर्मनी आणि डेरेसलाम,दुबई येथून आहेत.
नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम तिथी ३० जुलै ठेवण्यात आली होती, मात्र नामांकनाचा वाढता ओघ बघून २४ जुलैलाच नामांकन अर्ज घेणे बंद करावे लागले. कारण आयोजन समितीच्या वतीने फक्त १५० युवक युवतींच्या नामांकना अर्ज घेण्याचे नियोजन करण्यात आले होते, मात्र भरगच्च प्रतिसाद या आयोजनाला मिळाला आणि २५४ नामांकन दाखल झालेत.
या कार्यक्रमाच्या नियोजना च्या यशस्वीतेसाठी एकूण दहा समित्या गठित करण्यात आल्या होत्या.
ज्यात सलाहगार समितीमध्ये दिलीप भाई पोपट, महेदभाई आडतीया आणि जयेश भाई राजा आहेत. जाहिरात समिती – यामध्ये चंद्रकांतभाई पोपट, आशाबेन सादराणी, भावनाबेन सूचक, कृपाबेन राजा, प्रतीकभाई आडतीया, निकुंज राजा आणि धवल पोपट यांचा समावेश आहे. त्यानंतर आवास समिती – यामध्ये नरेशभाई खिरैया, कमलेशभाई कारिया, उमेशभाई कारिया आणि सुमितभाई आडतीया या सदस्यांचा समावेश आहे.
सजावट समिती – यामध्ये भारतीबेन हिंडोचा, जागृतीबेन आडतीया, गीताबेन विठलानी, जागृतीबेन सेदानी, श्वेताबेन तन्ना, हेतलबेन हिंडोचा, राधाबेन राजा, सोनलबेन राजा, पूजाबेन आडतीया, सिद्धीबेन सेठीया, पूजाबेन राजा, सरलाबेन तन्ना, रश्मीबेन रायचुरा, श्वेताबेन राजा, दीपिकाबेन दुवानी, संगीताबेन दासानी, रूपाबेन राजा, स्नेहाबेन दुवानी, कृपाबेन आडतीया यांचा समावेश आहे. त्यानंतर महत्त्वाची असते ती अर्थ समिती – यामध्ये हीरलभाई अढीया, केतनभाई सेठीया, मयुरीबेन सेठीया आणि रियाबेन आडतीया यांचा समावेश आहे.
नंतर व्यवस्थापन समिती – यामध्ये राजूभाई आडतीया, किरीटभाई ठक्कर, भावेशभाई दासानी, किशोरभाई भिंडा, निलेशभाई राजा यांचा समावेश आहे तर भोजन समितीमध्ये – अशोकभाई आडतीया, जितुभाई कारिया, घनश्यामभाई नाग्रेचा, कमलेशभाई भूप्ता, छायाबेन राजा, नेहाबेन हिंडोचा, ज्योतीबेन ठक्कर आणि राखीबेन आडतीया तर मंच संचालन समितीमध्ये – शितलबेन मसरानि, किरीटभाई गढीया, जयेशभाई सेठीया, आकाशभाई वसाणी इत्यादी सदस्यांचा समावेश आहे. या सर्व समित्या मिळून हे आयोजन यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अशी माहिती श्री लोहाना महाजन समिती अमरावतीचे उपाध्यक्ष श्री चंद्रकांत पोपट यांनी एका पत्रकाद्वारे दिली.