आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या मार्फत दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन.
कारंजा/अमरावती – महाराष्ट्रातील मागासलेल्या नाथसमाजाच्या सर्वांगीन विकासासाठी गुरु गोरक्षनाथ आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी वैदर्भीय नाथ समाज संघाच्या वतीने बच्चूभाऊ कडू यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना निवेदन देऊन करण्यात आली.
यामधे त्यांनी म्हटले आहे की,विरशैव लिंगायत, गुरव, रामोशी व वडार या चार समाजासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने अलीकडेच विविध आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली. अतीशय स्वागताहार्य हा निर्णय आहे. परंतु ही महामंडळे स्थापन करीत असतांना राज्य सरकारला बर्यापैकी म्हणजेच गुरव, रामोशी आणि वडार ह्या समाजापेक्षा मोठा आणि जास्त लोकसंख्या (२० ते २२ लाख) त्यातही अत्यंत मागासलेला असा नाथजोगी समाज हा दिसला नाही ही अत्यंत आश्चर्यजनक बाब आहे.
त्याचे कारण म्हणजे आपले गुरु स्व. धर्मवीर आनंदजी दिघे हे नाथ संप्रदायाचे दैवत श्री गच्छिद्रनाथ यांचे निस्सीम भक्त होते. आजही त्यांच्या आनंदाश्रमामध्ये मद्रिनाथाची मोठी प्रतिमा स्थापीत आहे. आणखी विशेष बाब म्हणजे आपले सहकारी उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस हे सुध्दा नाथ संप्रदायाला मानणारे नाथ भक्त आहेत. एवढं असुन सुध्दा नाथ जोगी समाजाकडे राज्यसरकारने अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे येथे दिसुन येत आहे.
याचे कारण म्हणजे आम्हाला राज्यात राजकीय नेतृत्व नाही हे आहे का 7 आणि राजकीय नेतृत्व नसेल तर पुर्ण महाराष्ट्रात २० ते २२ लाख लोकसंख्या असलेल्या मागास नाथ समाजाला आपण फक्त राजकीय स्वार्थापुरते वापरत आहात असे आम्ही समजायचे का ? वैदर्भिय नाथ समाज संघाच्या वतीने सदर विषयावर निवेदने सुध्दा शासनाला दिलेली आहेत.
आपले सरकार हे भगव्या झेंड्याखाली चालते आहे. य आमच्या नाथ समाजाची संपूर्ण भारतात ओळख ज्या व्यक्तीमुळे आहे ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदरणिय गोरखनाथ पिठाचे महंत योगी आदित्यनाथ हे आहेत. अलीकडेच कॉग्रेसचे सरकार असलेल्या राजस्थान राज्यशासनाने राज्यातील योगी, जोगी. नाथजोगी समाजाच्या आर्थिक विकासासाठी गुरु गोरखनाथ मंडळाची स्थापना केली आहे.
ह्या अनुषंगाने आपण सदर बाब गांर्भियाने विचारात घेऊन महाराष्ट्रातील २० ते २२ लाख लोकसंख्या आणि वारकरी संप्रदायापेक्षाही आधी अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्रातील नाथ संप्रदायातील आर्थिक दृष्टया मागासलेल्या व शासनाच्या विविध सवलतींपासून कोसो दूर असलेल्या नाथ समाजाच्या विकासाकरिता गुरु गोरक्षणाथ आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून न्याय यावा असे म्हटले आहे.
निवेदन देतेवेळी वैदर्भीय नाथ समाज संघाचे अध्यक्ष एकनाथ पवार, सचिव संतोष सातपुते,विदर्भ प्रमुख दिवाकर गौरकर, नवनियुक्त पश्चिम महाराष्ट्र समिती अध्यक्षा सौ.किर्ती शिवशंकर ठाकरे, महाराष्ट्र संपर्क प्रमुख अभिषेक पाठक,मार्गदर्शक श्री पुंडलिकनाथजी पाठक, श्री भारतनाथजी ठाकरे, मच्छिंद्रनाथ पाठक, अमरावती जिल्हा समिती अध्यक्ष श्रीरंगनाथजी वंजाळकर, बुलढाणा जिल्हा समिती अध्यक्ष अविनाश इंगळे, अमरावती महानगराध्यक्ष श्री नितीन अखतकर, अमरावती जिल्हा समिती सचिव श्री शामनाथजी गोदडे, श्री माणिक पारसकर, श्री राजेश पाठक इत्यादी नाथबांधव उपस्थित होते.