Monday, December 23, 2024
Homeराज्यश्री यशवंत बाबा जन्मोत्सव सोहळा उत्सवात साजरा...

श्री यशवंत बाबा जन्मोत्सव सोहळा उत्सवात साजरा…

यशवंत वाडी दरबार मेंढला यांचे आयोजन

सात दिवस विविध कार्यकमाचे मंडळा कडुन आयोजन

नरखेड तालुक्यातील मेंढला येथील यशवंत वाडी दरबार येथे यशवंत महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दिनांक 25-01-2023 तारखेपासुन सुरू झालेल्या या कार्यकमात रोज सकाळी 7 ते 9 वाजेपर्यत श्री यशवंत लिलामृत ग्रंथाच्या पारायणाचे वाचन करण्यात आले,

तसेच सात दिवस रोज रात्री 8 ते 10.30 पर्यत संगीतमय श्री यशवंत महाराज जिवन चरित्रकथेचे वाचन ह.भ.प.संजय विठ्ठलराव काकडे महाराज रा. घोराड .ता. वरूड. जिल्हा.अमरावती यांनी केले तर 30 तारखेला मंडळाकडुन सांयकाळी 6 वाजता पासुन 7 पर्यत होमवहन करण्यात आले तसेच रात्री ला ह.भ.प. हेंमत फाटे महाराज वाठोडा(चांदस) यांचे हरी किर्तन आयोजित करण्यात आले होते,

तसेच रोज मंगळवार ला श्रीची भव्य पालखी यात्रा ग्रंथ दिंडी मिरवणुक श्री यशवंत वाडी दरबार येथुन काढण्यात आली होती पालखीच्या स्वागतासाठी गावामधे स्वछता करुन ठीकठीकानी सुंदर रांगोळ्या काडण्यात आल्या होत्या काही ठीकानी चहा नास्ता देण्यात आला दुपारी काल्याचे कीर्तन नंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले या सर्व कार्यक्रमासाठी गावातील सर्व मंडळींनी अथक परीश्रम घेतले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: