Monday, December 23, 2024
Homeराजकीयछत्रपती शिवाजी महाराजांसह संभाजी महाराजांचा केलेला अवमान श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान सहन...

छत्रपती शिवाजी महाराजांसह संभाजी महाराजांचा केलेला अवमान श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान सहन करणार नाही – नितीन चौगुले यांचा इशारा…

सांगली – ज्योती मोरे

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांसह इतर राष्ट्र पुरुषांचा कोणीही केलेला अवमान श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान सहन करणार नाही असा इशारा संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांनी आज सांगली येथेआयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.

दरम्यान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी असो अथवा भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी असो कोणत्याही पक्षाचे नेतृत्व करणारे नेते असो जे छत्रपती शिवाजी महाराजांसह इतर महापुरुषांचा अवमान करतील त्या सर्वांना श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान जागा दाखवून देईल.

दरम्यान याबाबत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी 3 डिसेंबर रोजी रायगडावर आयोजित केलेल्या “निर्धार शिवसन्मानाचा” या कार्यक्रमासाठी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचे महाराष्ट्रातले हजारो मावळे समर्थन देणार असून राज्यपालांना हटवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. अशी प्रतिक्रियाही नितीन चौगुले यांनी व्यक्त केली आहे.

तर अशा तऱ्हेने देशातील महापुरुषांविषयी अवमान कारक वक्तव्य करणाऱ्या विकृती विरोधात देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी 2 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता सांगलीतील शिवतीर्थावर श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान आणि सर्व शिवभक्तांच्या वतीने जोरदार निदर्शने करणार असल्याचा इशाराही नितीन चौगुले यांनी पुढे बोलताना दिला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: