आकोट- संजय आठवले
स्थानिक श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आकोट येथे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग आणि पॉवर लिफ्टिंग स्पर्धा श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आकोट येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत महाविद्यालयाच्या ८ खेडाळूनी सुवर्ण पदक, २ खेडाळूंनी रजत पदक तसेच ३ खेडाळूनी कांस्य पदक मिळवून महाविद्यालयाचे नाव लौकिक वाढवित महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. ह्या स्पर्धा शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख, प्रा. प्रफुल्ल देशमुख यांच्या आयोजनाखाली संपन्न झाल्या.
या स्पर्धेमध्ये हर्षल आमडारे बी.एस.सी. भाग -१, विशाल राऊत एम. कॉम. भाग – १, कु. माधुरी नाठे एम. कॉम. भाग – १, कु. ज्योती अवंडकार बी. ए. भाग – २, कु. दिपाली ताडे बी. कॉम. भाग-२, कु. आकांक्षा अरबे बीएससी. भाग – ३, यांनी वेटवेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या वजन गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये कु. माधुरी नाठे एम. कॉम. भाग – १, जिग्नेश चावडा बी. कॉम भाग – ३, यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. आणि कु. ज्योती अवंडकार बी. ए. भाग – २, कु. आकांक्षा अरबे बीएससी भाग-३, हर्षल आमडारे बीएससी भाग-१, यांनी वेगवेगळ्या वजन गटात व्दितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये जिग्नेश चावडा बी. कॉम. भाग – ३, यश झाडे बी. कॉम भाग -२, यांनी वेगवेगळ्या वजन गटात तृतीय क्रमांक प्राप्त केला. तसेच पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये कु. दिपाली ताडे बी. कॉम. भाग – २, हिने तृतीय क्रमांक प्राप्त करून भरीव यश संपादन केले आहे.
स्पर्धा यशस्वी पार पाडण्याकरीता प्राचार्य डॉ. सुनील पांडे, क्रीडा संचालक प्रा. प्रफुल्ल देशमुख, नयन करवते आणि महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.