बिलोली – रत्नाकर जाधव
सलग ३९ वर्ष या देशाची सेवा केलेल्या भुमीपुञावर फुलांचा वर्षाव करीत बिलोली शहरातुन भव्य मिरवणूक काढुन जोरदार स्वागत करण्यात आले. बिलोलीचे भुमिपुञ शंकरराव रामराव बोंगाळे हे केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) मध्ये कार्यरत होते.त्यांनी सलग ३९ वर्षे या देशाची चांगल्या पध्दतीने सेवा केली या सेवेच्या कालावधीमध्ये अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या कार्याचा ठसा देखील उमटविला. नुकतेच सिआरपीएफ मधुन बोंगाळे निरीक्षक या पदावरुन सेवानिवृत झाल्यानंतर त्यांच्या परिवारासह तमाम बिलोली वासियांच्या वतीने शहरातुन भव्य मिरवणूक काढून त्यांचे जोरदार स्वागत केले.
दि.१३ जुलै रोजी बोधन रोड येथिल कुंचनवार मंगल कार्यालयात या सेवानिवृती गौरव सोहळ्याचे अयोजन करण्यात आले होते.यावेळी माजी सैनिक संघटना नांदेड यांच्यासह अनेकांनी शंकररावजी बोंगाळे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.बोंगाळे यांचे स्वागत केले.यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर सत्कारमुर्ती शंकर बोंगाळे यांनीही ३९ वर्षे सेवा केलेल्या अनेक आठवणी व घटनाना उजाळा दिला.
या सोहळ्याला माजी आ.अविनाश घाटे,माजी नगराध्यक्ष यादवराव तुडमे, भिमराव जेठे,विजय कुंचनवार,साहेबराव बागेलवाड, माधवराव जाधव,माजी उपनगराध्यक्ष शंकर मावलगे, पोलिस निरीक्षक अतुल भोसले, माजी सैनिक शंकरराव मुंडकर,संतोष उत्तरवार,कलुरे,माजी उपाध्यक्ष खंडु खंडेराय,भिमराव लाखे,प्रा.शंकर पवार, प्रकाश पोवाडे,रत्नाकर जाधव, संजय जाधव,मुकिंदर कुडके,सेवानिवृत कर्मचारी पानकर,बसवंत मुंडकर यांच्यासह आजी-माजी सैनिक,शहरातील नागरिक, मिञपरिवार,नातेवाईक व महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.सुञसंचलन भाऊसाहेब बनबरे यांनी केले.