स्मार्ट कार्ड छपाई होत नसल्यामुळे गेली 2 महिने महाराष्ट्र राज्यात मोटार ड्रायव्हिंग लायसन्सचा तीव्र तुटवडा जाणवत असून अशा प्रकारच्या तक्रारी राज्यातील मोटार ड्रायव्हिंग स्कूल,संचालक व नागरिक महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटनेकडे करत असल्याचे उपाध्यक्ष व मेहता मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालक श्री.विठ्ठल मेहता यांनी सागितले.
वाहन चाचणी परीक्षा दिल्यानंतर 3 आठवड्याचा आत लायसेन्स पोस्टाने घरी येणे अपेक्षित असते पण तसे होत नसल्यामुळे ज्यांनी मोटार ड्रायव्हिंग स्कूल मार्फत अथवा स्वतः प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन वाहन चाचणी परीक्षा दिली ते 2 महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी लायसेन्स येणे सोडा प्रणाली छपाई झाली नसल्याचेही दाखवत नसल्याचे पाहून त्रस्त झाले आहेत.पोलिसही अत्यंत विश्वासार्ह e प्रिंट मान्य करीत नाहीत.
पुण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात दरमहा वाहन चाचणी परीक्षा उत्तीर्ण,नूतनीकरण,दुय्यम प्रत,नाव ,पत्ता बदल ई.कारणास्तव दरमहा 30000 च्या जवळ पास स्मार्ट कार्डची गरज भासते.
महाराष्टातील मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालक,विविध संघटना,नागरिक,लोकप्रतिनिधी ई. आप आपल्या विभागातील प्रादेशिक/उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात या बाबत जोरदार पाठ पुरावा करूनही स्मार्ट कार्ड लायसेन्स पुरवठा सुरळीत होऊ शकला नाही.
सबब मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालक,वंचित लायसेन्स धारक ,सेवा भावी / वाहतूक विषयक संस्था, ई मार्फत केंद्रीय परिवहन मंत्री श्री.नितीन गडकरी,राज्याचे परीवहन मंत्री श्री.शंभूराज देसाई,परिवहन आयुक्त ई.ना 1 लाख पत्रे पाठवून तत्काळ लायसेन्स पुरवठा सुरळीत व्हावा ,व 8 दिवसाच्या आत लायसेन्स पोस्टाने घरी येण्याबाबत मागणी करण्यात येणार असल्याचे,व सर्वांनी प्रतिसाद द्यावा असे उपाध्यक्ष श्री. विठ्ठल मेहता यांनी कळविले आहे…