मध्प्रदेशातील इंदूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका विद्यार्थ्याने महिला प्राचार्याला पेट्रोल ओतून जिवंत जाळले. यात प्राचार्य गंभीररीत्या भाजल्याने त्यांची प्रकृती आहे. त्यांना गंभीर अवस्थेत तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपी विद्यार्थी आशुतोष याला अटक करण्यात आली असून काही प्रमाणात भाजला गेला असल्याची माहिती मिळाली आहे.
महिला प्राचार्याला जिवंत जाळल्याची ही घृणास्पद घटना सिमरोल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. येथील बीआयएन कॉलेजच्या प्राचार्याला एका माथेफिरू विद्यार्थ्याने पेट्रोल टाकून पेटवून दिले. विमुक्ता शर्मा असे प्राचार्याचे नाव आहे. या आगीत प्राचार्य गंभीररित्या जळाल्या आहेत, त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर विमुक्त शर्मा यांची प्रकृती चिंताजनक आहे.
विद्यार्थ्याने गाडीत बसताच पेट्रोल फेकले
प्राचार्य विमुक्ता शर्मा आणि विद्यार्थ्यामध्ये काही दिवसांपूर्वी वाद सुरू होता. आजही दोघांमध्ये काही वाद झाला. विमुक्ता शर्मा बीएम कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये प्राचार्य आहेत. आज कॉलेजला सुट्टी संपल्यानंतर प्रिन्सिपल आपल्या गाडीतून घरी जाण्यासाठी निघाले होते. अगोदरच थांबलेल्या अवनीश या विद्यार्थ्याने त्याच्या दिशेने धाव घेत त्याच्यावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिले. वाहन आणि पेट्रोलमुळे आग वेगाने पेटली. प्राचार्य आगीत गंभीर जळाल्या. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस अधीक्षक व इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आशुतोष या विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.