धीरज घोलप
घाटकोपर – तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी अंगणवाडी मध्ये असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. अंगणवाडी मधील नित्कृष्ट पोषक आहार खात असल्याचा प्रकार समोर आला आहे. MAHAVOICE NEWS अंगणवाडी वरती करत आहे स्पेशल रिपोर्ट.
पालकांनो तुमची मुलं कसला पोषक आहात खातात ही एकदा तपासून पाहण्याची वेळ आली आहे. कारण हे गहू बघा यामध्ये फक्त उंदराच्या आणि पालीच्या लेंडया दिसत आहे. हे किडलेले गहू पहा? या गव्हाच्या काय दर्जाबाबत न बोललेलं बरं! हा पोषक आहार फक्त घाटकोपरमधील पार्क साईट च्या अंगणवाडीमध्ये पुरवलेला जात नसून संपूर्ण मुंबईच्या अंगणवाडीमध्ये वितरित केला जातो. मात्र बहुतांश अंगणवाडीमध्ये असाच पोषक आहार दिला जातो. लेंड्या व सडलेले धान्य लहान मुलांच्या तोंडी घालणाऱ्या कंत्राटदाराची यातून पोषण होत नाही ना अशी शंका व्यक्त केली जाते. किडलेले धान्य मध्ये उंदराच्या व पालीच्या आढळतात ते अन्न पोषक कसे असेल असा प्रश्न व्यक्त केला जातो.
काय आहे नेमका प्रकार
पार्कसाईट विभागातील सोमेश्वर नगर परिसरात दिल्या जाणाऱ्या पोषक आहारात उंदराच्या आणि पालीच्या लेंड्या आढळलेल्या आहेत. पालकांच्या सतरतेमुळे संभाव्य धोका टळला असला तरी जनवारेही तोंड लावणार नाही असे विषारी अन्न चिमुकल्यांच्या माथी मारले जात आहे.
सोमेश्वर नगर परिसरातील अंगणवाडी येथील अनेक बालकांना पोषक आहार दिला जातो. घाटकोपर एकात्मिक बाल विकास प्रकल्प या अंगणवाड्यामार्फत सुरू आहे. Maharashtra consumer federation हे पोषक आहार पुरवले जातात मात्र कोणत्याही सामाजिक संस्था हे कंत्राट दिलेले नाही हे का ?हे सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे.