Monday, December 23, 2024
Homeराज्यधक्कादायक ! नदीपात्रात बुडून दोन मुलांना जलसमाधी...

धक्कादायक ! नदीपात्रात बुडून दोन मुलांना जलसमाधी…

रामटेक तालुक्यातील महादूला येथील घटना

रामटेक – राजु कापसे

पोलीस स्टेशन रामटेक हद्दीत येणाऱ्या महादूला येथे पोहण्याच्या नादात पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दि.7 सप्टेंबर रोजी 11 वाजताच्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार, रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गट ग्रामपंचायत महादूला येथील वृषभ राजेंद्र गाडगे व रोहन सुभाष साऊसाखडे वय 13 वर्षे. हे दोघेही श्री संत ज्ञानेश्वर महाराज विद्यालय,महादूला येथे इयत्ता 8 वी मध्ये शिक्षण घेत होते. शाळेला सुट्टी असल्याने गावाजवळील नदीत त्यांना पोहण्याचा मोह आला.

11 वाजताच्या सुमारास दोघेही नदीत उतरले.दोघांपैकी एकाला पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात जाऊ लागला.त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसराही खोल पाण्यात बुडाला. गावातील गोताखोरांच्या मदतीने दोन्ही मुलांना शोधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात ते अपयशी ठरले.

घटनेची माहिती महादूला येथील सरपंच शरद डडूरे यांना मिळताच त्यांनी आमदार आशिष जयस्वाल यांना माहिती दिली.त्यांनी तात्काळ SDRF टीम घटनास्थळी पाठवली. SDRF टीमने दोन बोटींच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली.मात्र वृत्त लिहिस्तोवर दोन्ही मुलांचा शोध लागला नाही.

मृतक वृषभ आणि रोहन दोघेही आईवडिलांना एकुलते एक असल्याचे समजते. घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून संपूर्ण गावात शोककळा पसरली असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: