नांदेड – महेंद्र गायकवाड
नांदेड पोलीस दलाची भरती प्रक्रिया सुरळीत चालू असताना एका उमेदवाराकडे 1 इंजेक्शन ची सिरींज व ऑक्सिबूस्टर नावाच्या औषधाची बॉटल सापडल्याने त्या उमेदवारास भरती प्रक्रियेतून अपात्र करण्यात आले आहे.
नांदेड पोलीस दलाची भरती प्रक्रिया हि 2 जानेवारीपासून चालु असुन सदरची प्रक्रिया ही दररोज सकाळी 05.00 वा. पासुन पोलीस मुख्यालय नांदेड येथे सुरू आहे. दिनांक 6 जानेवारी रोजी अंदाजे 06.00 वा. चे सुमारास उमेदवाराचे अर्ज छाननी करून कागदपत्र तपासुन पुढील भरती प्रक्रिया करीता बायो मॅट्रीक चाचणी पुर्ण करून उमेदवारांना मुख्य ग्राऊंड मध्ये सोडण्याची प्रक्रिया चालु होती.
एक उमेदवार लघुशंकेचे कारण दर्शवुन बाथरूमकडे गेला त्या बाजुस बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोउपनि डाकेवाड सोबतचे पाच अंमलदार यांना सदर उमेदवारांचा संशय आल्यामुळे त्याचेवर लक्ष ठेवुन तपासणी केली असता त्याचे जवळ 1 इंजेक्शनची सिरींज आणि ऑक्सीबुस्टर नावाचे औषधाची बॉटल आढळुन आली. सदर उमेदवारास भरती प्रमुखाकडे हजर केले असता. भरती कमीटीने सदर उमेदवारास भरती प्रक्रिये मधुन अपात्र ठरवुन योग्य ती कार्यवाही करण्यात आली आहे.
पोलीस भरती प्रक्रियेमध्ये भाग घेणाऱ्या उमेदवारांनी पोलीस भरतीस येते वेळेस कोणतेही संशयास्पद, उत्तेजनाथे द्रव्य घेवु नये किंवा सोबत बाळगुनये. सर्व उमेदवारांची बायोमॅट्रीक व मॅन्युअली तपासणी करून पुढील भरती प्रक्रियामध्ये उमेदवारांना सोडण्यात येत आहे.
अचानकपणे कोणत्याही उमेदवारांचे रक्ताचे नमुने, लघवीचे नमुने घेण्यात येत असुन त्यांच्या रक्त किंवा लघवीच्या नमुन्यामध्ये कांही संशयीत घटक आढळुन आल्यास त्या उमेदवारास पोलीस भरती करीता अपात्र ठरविण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.