Monday, December 23, 2024
HomeBreaking Newsमातृतीर्थ जिजाऊंच्या तालुक्यात धक्कादायक प्रकार...अमरावतीच्या डॉक्टर तरुणीला जबर मारहाण करून धिंड काढण्याचाही...

मातृतीर्थ जिजाऊंच्या तालुक्यात धक्कादायक प्रकार…अमरावतीच्या डॉक्टर तरुणीला जबर मारहाण करून धिंड काढण्याचाही प्रयत्न…

बुलढाणा : मातृतीर्थ जिजाऊंचे माहेर असलेल्या सिंदखेड राजा तालुक्यातील बारलिंगा गावामध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे अमरावती जिल्ह्यातील एका डॉक्टर तरुणीला जबर मारहाण करण्यात आली आहे. याच बरोबर डॉक्टर तरुणीचा गावातील लोकांनी विनयभंगही केला. अंढेरा पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरुन जबर मारहाण आणि विनयभंगाचे गुन्हे तीन आरोपींवर दाखल केले आहेत. मात्र अद्याप आरोपींना अटक केली नाही. या घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बारलिंगा गावामध्ये अमरावती जिल्ह्यातील डॉक्टर तरुणी या छोट्याशा गावात सायंकाळी पाच वाजता आली होती. ही तरुणी गावातील एका घरात शिरली. मात्र या घरातील दोन पुरुष आणि एक महिलेने या तरुणीला जबर मारहाण करत गल्लीत आणि मारहाण करत गावातून फिरवले. या तरुणीला इतकी मारहाण केली की या तरुणीचे कपडे सुद्धा फाटले. सुदैवाने गावातील काही सुज्ञ नागरिकांनी या तरुणीला अंढेरा पोलीस स्थानकात पोहोचवले. अंधेरा पोलिसांनी चौकशीअंती बारलिंगा गावातील एक महिला आणि दोन पुरुषांवर जबर मारहाण करणे आणि विनयभंग करणे असे गुन्हे दाखल केले आहेत.

अमरावती जिल्ह्यातील ही तरुणी बारलिंगा या गावात का आली?, ती आरोपींच्याच घरात का शिरली?, आरोपींनी तिला का मारहाण केली, उच्चशिक्षित डॉक्टर व वैद्यकीय अधिकारी असलेली ही तरुणी एकटीच या गावात का आली या प्रश्नांची उत्तरे मात्र पोलिसांनी अद्याप माध्यमांना दिली नाहीत. रात्री बारा वाजता ज्यावेळेस माध्यमांना ही बातमी कळली त्यावेळेस माध्यमांनी अंधेरा पोलीस स्थानक गाठले. मात्र यावेळी पोलिसांनी या तरुणीला लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला व याबाबत योग्य माहिती माध्यमांना दिली नाही. परंतु प्रत्यक्षदर्शी यांनी काही वेगळीच माहिती माध्यमांसमोर दिली आहे. यातील गावातील सुधाकर नागरे या व्यक्तीने या पीडित तरुणीला बारलिंगा गावातून 30 किलोमीटर असलेल्या अंढेरा पोलीस स्थानकात पोहोचवले. उच्चशिक्षित व वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉक्टर तरुणीला अमरावतीहून बारलिंगा या छोट्याशा गावात काय काम पडलं असावं….? पोलीस स्थानकात नेमकं काय काय घडलं?असेच अनेक प्रश्न आता निरुत्तरित आहेत याची उकल बुलढाणा पोलीस अधीक्षक करतील काय, असा प्रश्न आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: