Sunday, July 21, 2024
spot_img
HomeMarathi News Todayधक्कादायक ! लग्नाच्या ८ वर्षानंतर तिला माहिती पडलं…तिचा नवरा पूर्वी स्त्री…

धक्कादायक ! लग्नाच्या ८ वर्षानंतर तिला माहिती पडलं…तिचा नवरा पूर्वी स्त्री…

गुजरातच्या वडोदरा येथून धक्कादायक प्रकरण समोर आले आहे की जे ऐकून कानावर विस्वास बसत नाही. लग्नाच्या आठ वर्षांनंतर जर कोणाला कळले की तिचा नवरा पूर्वी स्त्री होता, तर तिचे काय होईल? होय! वडोदरा येथील एका 40 वर्षीय महिलेला, लग्नाच्या आठ वर्षानंतर, तिचा नवरा पूर्वी एक स्त्री होता आणि नुकतेच लिंग बदलाचे ऑपरेशन करून तो पुरुष झाला हे जाणून तिला धक्काच बसला.

वडोदरा येथील गोत्री पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये शीतलने (नाव बदलले आहे) विराज वर्धन (पूर्वी विजया) यांच्यावर “अनैसर्गिक लैंगिक संबंध” आणि फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी एफआयआरमध्ये कुटुंबातील सदस्यांची नावेही नोंदवली आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शीतलने पोलिसांना सांगितले की, ती नऊ वर्षांपूर्वी विराज वर्धनला एका मॅट्रिमोनियल वेबसाइटद्वारे भेटली होती. तिच्या माजी पतीचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता, त्यानंतर ती त्यांच्या 14 वर्षांच्या मुलीसोबत राहत होती.

हनिमूनच्या बहाण्याने
शीतलने सांगितले की, तिने २०१४ मध्ये विराजशी कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न केले आणि हनीमूनसाठी काश्मीरलाही गेले होते. बातमीनुसार, ‘विराजचे शीतलसोबत अनेक दिवसांपासून शारीरिक संबंध नव्हते. याबाबत तो वेगवेगळी सबब पुढे करत राहिला. शीतलने त्याच्यावर दबाव आणला तेव्हा त्याने दावा केला की काही वर्षांपूर्वी रशियामध्ये त्याच्यासोबत झालेल्या अपघातामुळे आपण शारीरिक संबंध करू शकत नाही.

एका महिलेसोबत अनैसर्गिक सबंध करणाऱ्या विराजने जानेवारी 2020 मध्ये सांगितले की तो लठ्ठपणा कमी करण्यासाठी बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रियेसाठी कोलकाता येथे जात आहे. मात्र, नंतर त्यांनी सांगितले की, तो पुरुष अवयव प्रत्यारोपणासाठी शस्त्रक्रिया करण्यासाठी कोलकाता येथे गेला होता. आरोपीने तिच्यासोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप महिलेने केला असून, याबाबत कोणाला सांगितल्यास त्याचे परिणाम खूप वाईट होतील, अशी धमकी दिली आहे. गोत्रीचे पोलीस निरीक्षक एमके गुर्जर यांनी सांगितले की, आरोपी हा दिल्लीचा रहिवासी असून त्याला वडोदरा येथे आणण्यात आले आहे…

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: