Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीधक्कादायक...अकोल्यात १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार...आरोपी अटकेत...

धक्कादायक…अकोल्यात १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार…आरोपी अटकेत…

अकोला – अकोला जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनामध्ये वाढ होताना दिसत आहे. बलात्काराच्या घटना ज्या आधी इतर राज्यातून ऐकायला मिळायच्या ते आता आपल्या अकोल्यात ऐकायला मिळत आहे. काल एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अकोला शहरातील सिव्हिल पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली असून बलात्कार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी गजाआड केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला शहरातील मोठी उमरी भागात राहणारी एक १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीबरोबर रस्त्याने घरी जात असताना ओळखीतील एक २६ वर्षीय तरुण तिथे आला, अन् म्हणाला, “चल तुला घरी सोडून देतो.”, असं म्हणून तिला उमरीतील स्मशानभूमीच्या मागच्या बाजूला घेऊन गेला. अन् तिच्यावर जबरी अत्याचार केलाय. हा प्रकार गेल्या दहा दिवसांपूर्वी म्हणजेच १५ जानेवारीच्या रात्री घडला होता.

या प्रकारानंतर आरोपी तरुणाने अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच या प्रकरणाची कुठे वाच्यता केल्यास तुझ्या घरच्यांनाही ठार मारून टाकेन, असे तो म्हणाला. त्यामुळे अल्पवयीन मुलीने भीतीपोटी हा प्रकार कुठे सांगितला नाही. दरम्यान काही दिवसानंतर मुलीच्या अंगावर तसेच पाठीवर जखमा दिसून आल्या. यासंदर्भात तिच्या आजीने तिला विचारना केली अन् तिने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला.

त्यानंतर लागलीच कुटुंबीयांनी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुलीवर घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य पाहता आरोपी २६ वर्षीय तरुणाला बेड्या ठोकल्या. आरोपीविरुद्ध ३७६, ३५४ सह बाल संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक तथा सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज कांबळे करीत आहेत. तसेच अटक केलेल्या तरुणाला न्यायालयात हजर करण्यात येणार असून पोलीस न्यायालयात त्याच्या कोठडीची मागणी करणार आहेत. दरम्यान अटकेत असलेला आरोपी हा विवाहित असून आकाश रामचवरे असे त्याचे नाव आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: