Monday, December 23, 2024
Homeराजकीयनागपुरात देवेंद्र फडणवीसांना धक्का...महाविकास आघाडीचे सुधाकर आडबाले विजयी...

नागपुरात देवेंद्र फडणवीसांना धक्का…महाविकास आघाडीचे सुधाकर आडबाले विजयी…

नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा धक्कादायक निकाल समोर आला आहे. महाविकास आघाडी पुरस्कृत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर आडबाले यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार नागोराव गाणार याचा पराभव केला आहे. सुधाकर आडबाले यांचा 16 हजार 500 मतांनी विजयी झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा देवेंद्र फडणवीस आणि भाजपासाठी मोठा धक्का आहे.

नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये २२ उमेदवार रिंगणार होते. येथे सरासरी ८७.२६ टक्के मतदान झाले होते. भाजप समर्थित उमेदवार नागो गाणार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले यांच्याच प्रमुख लढत होती. पहिल्या फेरीच्या मतमोजणीत अडबाले यांना १४०७१ तर गाणार यांना ६३०९ मते मिळाली. एकूण ७ हजाराहून अधिक मतांनी अडबाले आघाडीवर होते.

पहिल्या फेरीत मतांचा कोटा पूर्ण करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. दहा वर्षापासून भाजपकडे असलेली नागपूरची जागा महाविकास आघाडीने जिंकली भाजपने गाणार यांची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. महत्वाचे म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या होम ग्राउंडवरच महाविकास आघाडीने विजय मिळवल्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: