Sunday, December 22, 2024
Homeराजकीयभाजपाला रामराम करत प्रफुल गजबे बांधणार शिवबंधन, नवरात्रीच्या शुभ महोत्तावर नागपूर जिल्ह्यात...

भाजपाला रामराम करत प्रफुल गजबे बांधणार शिवबंधन, नवरात्रीच्या शुभ महोत्तावर नागपूर जिल्ह्यात मोठ स्फोट होणार…

अनेक भाजप कार्यकर्ते पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करणार

नरखेड – अतुल दंडारे

भारतीय जनता पार्टी चे नरखेड तालुक्यातील ताकतवर नेते प्रफुल गजबे लवकरच शिवसेना पक्ष प्रमुख ऊद्धव ठाकरे यांच्या हस्ते नागपूर जिल्हा प्रमुख राजु हरणे यांच्या उपस्थितीत तसेच अनेक शिवसैनिकांच्च्या समक्ष शिवसेनेत प्रवेश करून शिवबंधन बांधणार आहे.

नरखेड येथील प्रफुल गजबे यांनी २०१४ मधेल विधानसभेची निवडणुक अपक्ष सिलेंडर या चिंन्हावर लढवली होती व पुर्ण काटोल विधानसभा क्षेत्र पिंजून काढलं होत नंतर गडकरी साहेबांच्या हस्ते त्यांचा भाजपा मधे प्रवेश झाला होता.

अंतर्गत गटबाजी व कलहा मुळे त्यांनी भाजपाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. प्रफुल गजबे यांना राजकीय वारसा लाभला असुन त्यांच्या आई स्व.सुमनताई गजबे ह्या अकरा वर्षे जिल्हा परिषद सदस्या होत्या तसेच त्यांनी अनेक पदांवर काम केले होते.

प्रफुल गजबे यांच्या पत्नींनी सुध्दा जिल्हा परिषद निवडणुक भाजपा कडुन लढवली होती. नुकत्याच महाराष्ट्रत झालेल्या घडामोडींमुळे शिंदे गट फुटुन वेगळा झाला आणी भाजपा सोबत जावुन सरकार बनवलं त्यामुळे झालेली पक्षाची हाणी भरूण काढण्याचा प्रफुल गजबे यांचा अल्पसा मानस आहे.शिवबंधन बांधत असल्यामुळे प्रफुल गजबे यांच्या कार्यकत्यात व मित्रपरीवारात आनंदाच वातावरण असुन शिवसेनेच्या कार्यकत्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: