Shivam Dube : बर्याच दिवसापासून दुखापतग्रस्त असलेल्या हार्दिक पांड्याची टीम इंडियामध्ये सामील होण्याची आशा मावळत असल्याचे दिसत आहे कारण, शिवम दुबे सध्या जबरदस्त फार्मात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात शिवम दुबेने ६० धावांची खेळी केली होती. याशिवाय गोलंदाजी करताना 1 बळीही घेतला. आता दुसऱ्या T20 सामन्यातही शिवमने 63 धावांची नाबाद खेळी केली आणि पुन्हा एक विकेट घेतली. शिवमने आपल्या कामगिरीने संघाला अशा प्रकारे प्रभावित केले आहे की आता त्याच्याकडे हार्दिक पांड्याचा बदली खेळाडू म्हणून पाहिले जात आहे.
दुबेची फलंदाजीत युवराजची झलक
शिवम दुबे बॅट आणि बॉलने चमत्कार करू शकतो. हार्दिक पांड्या हा एक अष्टपैलू खेळाडू असून गोलंदाजीसोबतच तो शानदार फलंदाजीही करतो. शिवम दुबे हा मध्यमगती गोलंदाज आहे. हार्दिक पांड्या हा देखील मध्यमगती गोलंदाज आहे. अशा परिस्थितीत हार्दिक पांड्याऐवजी शिवम दुबेकडे सर्वोत्तम पर्याय म्हणून पाहिले जात आहे. चाहते शिवम दुबेला युवराज सिंगसोबत जोडत आहेत. शिवम दुबेची फलंदाजी युवराज सिंगची आठवण करून देत असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे.
शिवम हार्दिकची जागा घेणार
युवराज सिंग हा डाव्या हाताचा फलंदाज होता आणि गोलंदाजीतही प्रवीण होता. त्याचप्रमाणे शिवम दुबे हा देखील डावखुरा फलंदाज आहे. अशा परिस्थितीत शिवम दुबेचे नाव युवराज सिंगसोबत जोडले जात आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील मालिकेतील तिसरा सामना १७ जानेवारीला होणार आहे. शिवम दुबे या सामन्यातही चांगला खेळला तर त्याचे टी-२० विश्वचषकातील खेळणेही जवळपास निश्चित मानले जाईल. यासोबतच भारतीय संघाला हार्दिक पांड्याची जागाही मिळणार आहे.
हार्दिक पांड्या बऱ्याच दिवसांपासून दुखापतग्रस्त आहे. २०२३ च्या आयसीसी विश्वचषकादरम्यान तो जखमी झाला होता, त्यामुळे हार्दिक अद्याप संघात परतला नाही. पण आता हार्दिकला दुखापत झाली तरी त्याच्या जागी शिवम दुबे संघात सामील होऊ शकतो.
Explosive batting display with @imVkohli
— BCCI (@BCCI) January 15, 2024
That sprint & run-out
Conversations with Captain @ImRo45
In conversation with fifty-up @ybj_19 – By @ameyatilak
WATCH #TeamIndia | #INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/qJgrKwarFA