रामटेक – राजु कापसे
रामटेक – स्थानिक रविकांत रागीट प्रशासकीय महाविद्यालय,रामटेक व दमयंतीताई देशमुख बी.एड व डी.एड कॉलेज, रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थाध्यक्ष रविकांत रागीट तथा प्राचार्या जयश्रीताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोज सोमवरला महाविद्यालयात रयतेचा राजा ‘छत्रपती शिवाजी महाराज ‘ यांची जयंती साजरी करण्यात आली.
या दिनाचे औचित्य साधून इतिहास विभागाअंतर्गत विद्यार्थ्यांकरिता निबंध स्पर्धा तसेच प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी बी.ए. प्र.च्या विभागप्रमुख प्रा.चेतना उके,बी.एड. च्या विभागप्रमुख उर्मिला नाईक,
डी.एड.च्या विभागप्रमुख शालू वानखेडे, NSS विभागप्रमुख प्रा.ज्ञानेश्वर नेवारे, बी.एड.NAAC समन्वयक प्रा.किरण शेंद्रे,सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.देवानंद नागदेवे, प्रा.डॉली कळमकर, प्रा.मेघा जांभुलकर तसेच इतर प्राध्यापक कला मेश्राम, प्रा.अमित हटवार,प्रा.मयुरी टेम्भुरणे, प्रा.अनिल मिरासे, प्रा.विलास मडावी, प्रा.आकाश मोहबिया,
सुरेश कारेमोरे, गीता समर्थ, अतुल बुरडकर, निकिता अंबादे, राजेंद्र मोहनकर, निकिता फाये, संदीप ठाकरे इत्यादी सह बऱ्याच संख्येत विद्यार्थी उपस्थित होते.