रामटेक – राजु कापसे
युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार व पंचायत समिती अंतर्गत शिवा भाल व निकिता हटवार यांची दिल्ली येथे आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत मेरी माटी मेरा देश या उपक्रमासाठी निवड झाली असून, ते रामटेक तालुक्याचे प्रतिनिधीत्व करणार जिल्ह्यातील ग्रामस्तरावर ५ ते १५ ऑगस्ट या दरम्यान अमृत कलश यात्रा काढून घरोघरी माती गोळा करण्याचा कार्यक्रम नेहरू युवा केंद्र नागपूर व पंचायत समिती रामटेक च्या माध्यमातून आयोजित केला होता.
दिल्लीत अमृत वाटिका तयार करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून साडे सात हजार कलशांमधून माती घेऊन अमृत कलश यात्रा काढणार असून, ही अमृत वाटिका एक भारत, श्रेष्ठ भारत या वचनपूर्तीचे प्रतीक आहे.
शुक्रवारी २७ ऑक्टोंबर ला ऑगस्ट क्रांती मैदान मुंबई येथे कलश घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आणि संसद सदस्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होईल. त्यानंतर १ नोव्हेंबरला अंतिम सोहळ्याचे आयोजन दिल्ली येथे केले आहे. या सोहळ्यात पंतप्रधानांच्या उपस्थितीत राहतील व तालुक्याचे प्रतिनिधित्व शिवा भाल व निकिता हटवार करणार आहे.
दिनांक 25/10/2023 ला पंचायत समिती रामटेक येथुन गट विकास अधिकारी जयसिंग जाधव यांच्या हस्ते कलश सोपण्यात आले. यावेळी हरडे सर सहय्यक प्रशासन अधिकारी पंचायत समिती रामटेक, गट शिक्षण भाकरे सर तालुका समन्वयक भोजराज पडोळे कृष्ण भाल पंचायत समिती रामटेक, नेहरु युवा केंद्रचे तालुका समन्वयक शिवा भाल व प्रशासकीय अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग उपस्थित होते..