Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayशिव ठाकरे आता 'खतरों के खिलाडी १३' मध्ये सहभागी होणार...मानधनही मिळणार सर्वाधिक...

शिव ठाकरे आता ‘खतरों के खिलाडी १३’ मध्ये सहभागी होणार…मानधनही मिळणार सर्वाधिक…

‘बिग बॉस 16’ या रिएलिटी शो शिव ठाकरे जिंकू शकले नाही, तरी पण त्याने लोकांची मने जिंकली. आता तो आणखी एक रिएलिटी शो करणार आहे, ज्यामध्ये तो धोक्यांसोबत खेळताना दिसणार आहे. कधी तो उंचावरून लटकनार तर कधी साप आणि मगरी यांच्यामध्ये स्टंटबाजी करणार. होय, शिव आता रोहित शेट्टीच्या लोकप्रिय शो ‘खतरों के खिलाडी’ मध्ये सहभागी होणार आहे. चाहते त्याच्या 13व्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर शिव ठाकरे या शोसाठी सर्वाधिक फी घेत आहेत..किती ते जाणून घ्या…

खतरों के खिलाडी 13 या रिएलिटी शोचे प्रक्षेपण व्हायला अजून वेळ आहे, पण त्याआधीच यात कोणते सेलिब्रिटी सहभागी होणार याची चर्चा सुरू झाली आहे. या शोसाठी शिव ठाकरे यांचे नाव निश्चित झाले आहे. या शोसाठी तो स्वत:ला तयार करत असल्याचेही त्याने स्वतः सांगितले होते. पोहणे व शारीरिक प्रशिक्षण करत आहे. आणि का नाही करणार , तो या मोसमातील सर्वाधिक मानधन घेणारा स्पर्धक आहे.

Siasat.com मधील वृत्तानुसार, शिव ठाकरे ‘खतरों के खिलाडी’साठी प्रति एपिसोड 5 ते 8 लाख रुपये घेत आहेत. म्हणजे एका आठवड्यात तो 10 ते 16 लाख रुपये कमवेल. मात्र, याची खात्री मिळालेला नाही.

या शोसाठी ‘बिग बॉस 16’ फेम प्रियांका चहर चौधरी आणि अर्चना गौतम यांची नावे समोर येत होती. मात्र, नंतर प्रियांका या शोचा भाग नसल्याची बातमी आली. दुसरीकडे, टीव्ही अभिनेता करण टेकरनेही तो कोणत्याही रिएलिटी शोचा भाग नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: