स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा आरोप…
पनवेल – किरण बाथम
मागील अनेक दिवस चर्चेत असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी जाहीर केलेल्या आणि माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आलेल्या जे एस डब्ल्यू स्टील कंपनी विरोधातील आंदोलनाचा बार फुसका निघाल्याचा आरोप स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना केला. यावेळी माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या बरोबर स्थानिक शेतकऱ्यांची बाचाबाची झाली.
आजच्या मोर्चात स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी कोणीही नव्हते, सगळी बाहेरून मंडळी जमवून आणली होती. कंपनी मुळे स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. अशा मोर्चामुळे आमच्या रोजगारा वर परिणाम होत असल्याचा आरोप स्थानिक शेतकरी विजय पाटील यांनी बोलतांना केला.
आजच्या मोर्चात सामील झालेले माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सत्तेत असताना गडब एमआयडीसी बाबत आश्वासन दिली होती, परंतु त्या बाबत काहीही केलं नाही असा आरोप प्रशांत म्हात्रे यांनी केला. देसाई उद्योगमंत्री असताना का नाही मोर्चा काढला असा प्रश्न देखील म्हात्रे यांनी यावेळी उपस्थित केला.
जे एस डब्ल्यू स्टील कंपनी ने खारबंदिस्ती बांधली म्हणून गडब परिसरातील 2700 एकर भातशेती वाचली तेव्हा हे मोर्चेकरी कुठे होते ? असा प्रश्न प्रकल्पग्रस्त प्रकाश पाटील यांनी केला. ज्यांच्यासाठी हे आंदोलन विष्णू पाटील यांनी पुकारले होते त्या स्थानिकांनी सदर आंदोलनाला पाठ फिरवल्याचे दिसून आले.
यामुळे माजी मंत्री सुभाष देसाईना खऱ्या स्थानिक लोकांच्या रोषाला बळी पडावे लागले. कंपनी व्यवस्थापनासोबत चर्चेसाठी सुभाष देसाई शिष्टमंडळासोबत कंपनी मध्ये येत असताना तेथे जमलेल्या खऱ्या स्थानिक लोकांसोबत बाचबाची झाली आणि त्यांचा रोष पत्करावा लागला असल्याचे दिसून आले.
यावेळी प्रशांत म्हात्रे, परशुराम म्हात्रे, प्रकाश पाटील, विजय पाटील, प्रदीप म्हात्रे, निलेश कोठेकर, जगदीश कोठेकर, रवींद्र कोठेकर, अविनाश मोकल, एमडी पाटील, हरेश कोठेकर, अनिल कोठेकर, प्रितेश म्हात्रे हे स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.