खामगाव तालुक्यात व शहरी भागात मोठ्याप्रमाणात अवैध धंद्यांना जोर धरला आहे. शासकीय अधिकारी व पोलीसांना अवैध धंद्यावर आळा घालण्यात अपयश आलेल दिसतं आहे. खामगाव शहराच्या महत्वांच्या चौका चौका मंध्ये चोरुन वरली मटका खेळवला जात आहे.
तिचं परिस्थिती गावखेड्यांची झालेली आहे, अवैध दारु विकणे, अवैध गुटखा विक्री, एक्का बादशहा खेळणारे शहराच्या बाहेरील भागात तलावरोड, स्मशानभूमी, शेतात खेळतांना व खेळवतांना दिसत आहे. या समाजकटंका विषयी कुठल्याचं प्रकारची चौकशी कार्यवाही होतांना दिसत नाही आहे.
शहरातील बर्यांच गल्लीबोळीत, चौकात अवैध देशी दारु विकणारे निडरपणे दारु विक्री करतांना आढळतात, चौकातील प्रत्येक पानठेल्यावर शासनाने बंदी केलेल्या अवैध गुटख्यांची विक्री राजरोसपणे सुरु आहे, राशनचे अन्नधांन्या राजरोसपणे बाजारात विक्रीला येत आहे,
अवैध उत्खनन, अवैध रेती, गिट्टी, मुरुम तस्करी, बाळापुर तालुक्यातून खामगाव तालुक्यामध्ये अवैध प्रकारातून मोठ्या प्रमाणात स्टम्प पेपर ची विक्री चढ्या दराने होत आहे. “ज्या मधून अवैध मालमत्ता खरेदी विक्रीचे प्रकार उद्घाऊ शकतो. एका प्रकारे खामगाव तालुका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अवैध धंद्याचे माहेरघर झाल्याचे दिसून येत आहे.अधिकार्यांचा या अवैधधंदे करणार्यांवर कुठल्याचं प्रकारचा वचक राहलेला दिसत नाही किवां अवैध धंदे करणार्यांना मोकळीचं शासकीय अधिकार्यांनी दिली असे चित्र खामंगाव तालुक्यात दिसत आहे.
शेतकर्यांच्या पिक विम्याचे रक्कम न देणारे सरकार अवैध धंदे करणार्यांना माडीवर घेवुन गोजरतांना नागरिकांना जाणवत आहे. याचे दुष्परिणाम शहरातील, खेड्यातील नाबालीकं व युवांच्या मनावर होत आहेत. शाळकरी मुलं वरली मटक्याच्या, दारुच्या वेसनात गुरफटतांना शासन खुल्या डोळ्यांनी पाहत आहे.
शहरातील गंदीच्या भागात (चौपाटी, बगीचा) मुलींची छेड काढणारे टोळके च्या टोळके संध्याकाळी अश्या ठिकाणी जमा होवुन छेडखानीचे प्रकार करतांना आढळत आहे व या बाबत स्थानिक पत्रकारांनी आपल्या वृत्तपत्रात प्रकाशीत सुध्दा वेळावेळी केलेले आहे. तरी सुध्दा कुभकर्णी प्रशासन जागे होण्यास तयार नाही याचा अर्थ कुंपनचं शेत खात आहे असा समज सर्वसामान्य नागरिकांचा होत आहे.
अवैध धंदे करणारे व्यक्ती कुठल्याही पक्षाचे, समाजाचे, असो त्यांच्यावर ताबडतोब अंकुश लावण्याची जवाबदारी ही आपली व पोलीसप्रशासनाची आहे.सर्वसामान्य नागरिकांचा विचार लक्षात घेता आपणास विनंती आहे आपण खामंगाव शहर व तालुक्यातील अवैध धंदे शिताफीने बंद करुन अवैध धंदे करुन समाजाचा विकासात बाधा करणारे, समाजा समाजात तेढ निर्माण करणारे, नागरिकांना नेहमी दशहती मंध्ये जगण्यात लावणार्या या समाजकंठका विरोधात कार्यवाही करावी. अन्यथा शिवसेना उध्दव बाळासाहेब पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणात आदोलन छेडण्यात येईल व याची सर्व जवाबदारी प्रशासन म्हणून आपली राहील.