Sunday, December 22, 2024
Homeराज्यमहाराष्ट्रातील कुंभकर्णी सरकारला जागे करण्यासाठी शिवसेनेची शेतकरी संघर्ष यात्रा - आ.नितीन बापु...

महाराष्ट्रातील कुंभकर्णी सरकारला जागे करण्यासाठी शिवसेनेची शेतकरी संघर्ष यात्रा – आ.नितीन बापु देशमुख…

दानापूर – गोपाल विरघट

दानापूर येथील बस स्टॅन्ड वरील मंगलकार्यालय समोर आयोजित सभेमध्ये बोलताना कुंभकर्णी सरकारला जागे करण्यासाठी ही शिवसेनेची संघर्ष यात्रा आहे. शेतकऱ्याच्या समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी.भाजपाचा एकही आमदार विधान भवनात बोलत नाही.

अतिवृष्टी मदत ८० टक्कै लोकांना मिळाली नाही.पुर्वी च्या प्रमाणात मिळत नाही.आता विमा कंपनी सुध्दा भाजपच्याच आहेत.शिवशसेनेत गद्दारी झाली आणि सरकार पाडले गेले. अकोला जिल्हातुन सात तालक्यातुन ही शेतकरी संघर्ष यात्रा निघाली आहे.

या संघर्ष यात्रेमध्ये गोपाल दातकर,मा.आमदार संजय गावंडे जि.प. सदस्य संजय अढाऊ आमदार नितीन देशमुख यांचा २७० किलो मिटरचा पायदळ प्रवास झाला. पुढे बोलताना आ. देशमुख म्हणाले अन्याय करने जेवढा गुन्हा आहे, तेवढाच गुन्हा सहन करणे हा सुध्दा आहे. केंद्रीय सरकारने महाराष्ट्राच्या विकास केला नाही.

फक्त स्वप्न दाखवले २०१४ साली १५ लाख, प्रत्येक खात्यात टाकु बोलले .निवडणुकी करीता वेगळे वेगळे फन्डे वापरले आमीश दाखविले. २०१९ कच्चेघरावाल्यांना २०२३ पर्यंत प्रत्येकाला पक्के घर २०२४ ला फन्डा पन्नास टक्के महिला आरक्षण केवळ जनतेची दिशाभूल करत आहेत.आपली गारन्टी होती तर अरबी समुद्रात आज पर्यंत शिवस्मारकाची एक विट सुध्दा लागली नाही.स्मारक बांधले नाही, हे सरकार धर्माच्या नावाखाली मतदान मागत आहे.

बाळासाहेब ढाकरे यांनी शिवसेना स्थापन केली ती कलियुगात मराठी माणसांनवर अन्याय करणारे अनेक रावण आहेत ,त्या रावणांचा नाश करण्यासाठी ,धनुष्य बाण चिन्ह घेऊन लोकशाही मार्गाने या रावणाचा वध करण्यासाठी स्थापन केली होती. पण शिवसेनेच अपहरण भारतीय जनता पक्षाने केलं.आज भाजपा शेतकऱ्यांच्या मालाला का भाव देत नाही राजा हा प्रजेचा विचार करणारा असावा . शेतकऱ्याच्या बारीक सारीक गोष्टींचा विचार झाला पाहिजे.

चाणक्य सांगतोय ज्या प्रजेचा राजा निपुत्रिक असतो, त्या देशातील प्रजा सुखी राहु शकत नाही .असे आमदार देशमुख बापु दानापूर येथील बस स्टॅन्ड वरील मंगलकार्यालया समोर आयोजित सभेमध्ये भाजपावर टिका करताना म्हणाले.तुम्हा आपणास मतदानाच्या माध्यमातून आता क्रांती घडवावी लागेल,देवेंद्र फडणवीस अकोला जिल्हा पालकमंत्री असतांना अनेक दुःखद घटना अकोल्यात व जिल्ह्यात घडल्या, पण कधीच पालक मंत्र्यांनी फिरकुन सुद्धा पाहिले नाही.

मतदार संघाचा विश्वास संपादन करणारा आमदार असावा.जनतेचा विश्वास संपादन फक्त शिवसेनाच करू शकतो,भाजपाचा आमदार नाही.अकोट मतदार संघाचे आमदार अमरावती जिल्ह्यातील आहेत. हे आपल्या मतदार संघाचे दुर्दैव आहे.आपल्या मतदार संघात या योग्यतेचा नाही काॽ असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित जनतेला केला.

लोकप्रतीनीधी हा आपल्या मतदारसंघातील विकास करणारा असावा.विचाराची देवानं घेवाण झाली पाहिजे, आज महाराष्ट्रात देवेंद्र आणि केंद्रात नरेंद्र यांचे सरकार असतांना शेतकऱ्यांच्या मालाला भाव का देत नाहीत.शेतकऱ्यानीं ऐकी केल्याशिवाय जमणार नाही.

आज स्वस्त धान्य दुकानात केवळ महिलांना ३५ रुपये किंमतीची साडी देऊन हे भाजपाचे सरकार आमच्या माता बहिणीची थट्टामस्करी हे सरकार करत आहेत.या सभेला शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे जिल्ह्यातील व तालुक्यातील पदाधिकारी शिवसैनिक,शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन गोपाल विखे शिवसेना उपजिल्हाप्रमुख शेतकरी सेना  यांनी केले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: