Sunday, December 22, 2024
Homeराज्यशेलु फाट्यावरील गड्ड्यासाठी शिवसेना पक्षाचे अर्धनग्न आंदोलन...

शेलु फाट्यावरील गड्ड्यासाठी शिवसेना पक्षाचे अर्धनग्न आंदोलन…

वाशिम – चंद्रकांत गायकवाड

वाशिम मालेगाव हायवे वरील जीव घेण्या खड्ड्यापासून मुक्तता व्हावी यासाठी संबंधित विभागाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी आज शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वेगळ्या पद्धतीचे आंदोलन करण्यात आले असून यावेळी तालुकाप्रमुख उद्धवराव गोडे, विजय शेंडगे उपतालुका प्रमुख, युवातालुका प्रमुख अनिल शिंदे जलसम्राट विठ्ठलराव नवघरे,

गजानन बोरचाटे सरपंच डही, भारत घुगे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज अर्धनग्न आंदोलन करण्यात आले… आणि जर सार्वजनिक बांधकाम विभागाने हे गड्डे उद्यापर्यंत बुजले नाही तर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शेलु फाट्यावरील गड्डे स्वखर्चाने बुजोवन्यात येतील व यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्षात ठेवावे की गाठ शिवसेनेची आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाला फक्त कमिशन खाण्यावर जास्त लक्ष केंद्रित असल्यामुळे हे मेन मुंबई नागपूर हायवे वरील मोठमोठे रस्त्यावरील गड्डे दिसत नाहीत कारण या गड्ड्यावर कमिशन हे अधिकाऱ्याला मिळत नाही जर उद्यापर्यंत अधिकाऱ्याने हे गड्डी बुजवली नाही तर गाठ आमच्याशी आहे. उध्दव पाटील गोडे, तालुका प्रमुख शिवसेना मालेगाव

सार्वजनिक बांधकाम विभागाने मालेगाव तालुक्यातील मेन हवे वरील गड्डे तात्काळ बुजवावे व कमिशनच्या नादात सर्वसामान्य प्रवासाचा जीव धोक्यात घालू नये अन्यथा सर्वजनिक बांधकाम उपविभाग मालेगाव येथे शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी. विजय शेंडगे, उपतालुका प्रमुख शिवसेना मालेगाव

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: