आकोट – संजय आठवले
आकोट तालुक्यातील अनेक गावात नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शेतकऱ्याना नुकसान भरपाई म्हणून मिळणाऱ्या आर्थिक मदतीमध्ये शासना कडून शेतकऱ्यावर होत असलेल्या अन्याया बाबत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने उपविभागीय अधीकारी यांच्या कार्यालयात असंख्य शेतकरी बाधवांच्या वतीने ठीय्या आंदोलन करण्यात आले.
मागील वर्षी अचानक ढगफुटी सारखा पाउस झाला. अनेक अधीकारी यांनी दौरे केले. पंचनामे केले. पण शेतकऱ्याच्या हाती आजतागायत भइकएचआ कटोराच आला.
शासन निर्णय सीलएस २०२२/प्र क२९७”३- दि. १५ डीसेंबर २०२२ नूसार कोरडवाहु पिकाकरिता १३,६००, बागायती करिता २७,००० तर फळबाग बहुवार्षिक पिकाकरिता ३६,००० अशी मदत प्रती हेक्टर प्रती लाभार्थी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत घोषित करण्यात आली. त्याची अमलबजावणी कमीच प्रमाणात करण्यात आली. अनेक लाभार्थी यातुन वगळण्यात आले.
नवीन आलेल्या यादीमधे अनेक शेतकर्याची नावे डावलण्यात आली आहे. हे शासन इथेच थांबले नाही तर नविन शासन निर्णय काढुन शेतकर्यांना नविन शासान निर्णय सीएलएस २०२२/प्रक्र ३४९ म३ दि. २७मार्च २०२३ नूसार नविन शेतकर्यांना मदत म्हणून कोरडवाहु पीकाकरिता ८,५००, बागायती पीकाकरिता १,७०० तर फळ बाग बहुवार्षिक पिकाकरिता २२,५०० असे निकष ठरविण्यात आले.
पण त्या शासन निर्णयात अनेक जाचक शर्ती अटी टाकण्यात आल्या. त्याने शेताकऱ्यांना अतिशय तुटपुंजी मदत देण्यात आली. शेतकर्यांची अशी थट्टा शासन करीत आहे. सर्व शेतकर्याना खत, बी, बियाणे एकाच भावात मिळतात. मग हा मदतीतिल भेदभाव का? असा सवाल शिवसेनेनेच्या वतीने उपविभागीय अधीकारी यांना करण्यात आला.
शासन निर्णय सिएलएस २०२२ /क्रप्र १५ डीसेबंर २०२२ प्रमाणे शेतकर्याना मदत न मिळाल्यास शिवसेना आकोट तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा आणि जनहित याचीका दाखल करण्याचा ईशारा तालूका प्रमुख ब्रम्हा पांडे यांनी निवेदनातुन दिला.
यावेळी शिवसेना युवासेना महीला आघाडी चे पदाधिकारी तथा असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते. शिवसेना उपजील्हा प्रमुख दिलीप बोचे, महीला आघाडी जिल्हा संघटिका मायाताई म्हैसने, ब्रम्हा पांडे तालूका प्रमुख आकोट, शाम गावंडे जिल्हा समनवयक, विक्रम जायले विधानसभा संघटक, मनीष कराळे युवासेना उपजिल्हाप्रमुख, अमोल पालेकर,
ॲडव्होकेट मनोज खंडारे शिवसेना आकोट शहर प्रमुख, विजय ढेपे, सुभाष सुरत्ने, उषाताई गीरनाळे उपजिल्हा संघटक, मंगलाताई माने, शहर संघटक कार्तिक गावंडे, नंदु कुलट, उमेश अवारे, कमल वर्मा, प्रभुदास मेन्ढे, गोलु खलोकार, अक्षय बोदडे, प्रथमेश बोरोडे, गणेश डोबाळे, बंडु बोरोकार, विठ्ठल रेळे, अनिल ताडे, संतोष भगत, योगेश सुरनत्ने, राजू राहणे,
नागेश गावंडे, प्रशांत येवुल, रमेश सोनोने, गोपाल सोनोने, सचीन काळे, गजानन लोखंडे, सौरभ गावंडे, सुधाकर सोनोने, शिवाजीराव कुलट, विठ्ठल भरणे, मनोहर देवळे, नागेश गावंडे, बळीराम भीलावेकर, इ. असंख्य शेतकरी बाधंवाची यावेळी उपस्थीती होती.