Monday, November 18, 2024
Homeराजकीयसांगालीत आज 'दारू नको दूध प्या' उपक्रम बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे आयोजन...

सांगालीत आज ‘दारू नको दूध प्या’ उपक्रम बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे आयोजन…

सांगली – ज्योती मोरे

विवेकशील समाजाच्या जडपडणीसाठी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाच्या वतीने शनिवार ३१ डिसेंबर रोजी सांगली शहरात राम मंदीर चौक येथे सायंकाळी ६ वाजता ‘दारु नको दूध प्या’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठीच या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती साहेबांची शिवसेना युवा सेनेने जिल्हाध्यक्ष सचिन कांबळे, मनोज भिसे यांनी दिली.

तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही कांबळे व भिसे यांनी केले आहे. वर्षाचा शेवटचा दिवस ३१ डिसेंबर म्हटले की सेलिब्रेशन पार्टी ओघाने येतेच. विशेषत: तरुणाई तर या दिवसाची जोरदार तयारी करते. मात्र सेलीब्रेशनच्या नावाखाली व्यसनाधिनतेच्या आहारी जाणान्यांऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. दारू शिवाय मजा नाही, असा समज वाढत चालला आहे.

त्यामुळे नव्या वर्षाचे स्वागत क्षणभंगूर आणि आरोग्यास घातक दारु प्राशन करुन करण्याऐवजी दूध प्राशनाने करा असा संदेश देत समाजातील तरुणाईला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठीन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरुणांनी दारूसारख्या व्यसनापासून दूर ठेवण्याना या उपक्रमाचा हेतू आहे. या उपक्रमामध्ये तरुणानी गोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, नव वर्षाचे स्वागत दारु नव्हे तर दूध प्राशन करून कराचे असे आवाहन कांबळे व भिसे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: