सांगली प्रतिनिधी :–ज्योती मोरे
मुंबई येथे पार पडत असलेल्या दसरा मेळाव्यासाठी सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या शिवसेनिकांपैकी किमान तीन हजार शिवसैनिकांना पुरेल इतके जेवण, सांगली जिल्हा महिला आघाडीच्या वतीने घरातून घेतले जाणार असल्याची माहिती, शिवसेना महिला आघाडीच्या सांगली जिल्हा संघटिका सुजाता इंगळे यांनी दिली आहे.
सदर उपक्रमात जिल्ह्यातील अनेक महिला आपला सहभाग नोंदवणार असल्याचेही सुजाता इंगळे यांनी म्हटले आहे.