रामटेक – राजु कापसे
महिलांचे कर्तुत्व अधिक सक्षम करण्यासाठी आणि महिलांचे महत्व समाजापर्यंत पोहचविण्यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन शिवसेना रामटेक तालुका व शहर आघाडी तर्फे दि.१२ मार्च २०२४ रोजी गांधी चौक रामटेक येथ आनंद मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन रेवती कृपाल तुमाने, पल्लवी आशिष जयस्वाल यांच्या हस्ते दीप्रज्वलनाने कऱण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्षा नलिनी चौधरी,शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख रश्मी काठीकर,रामटेक शहर लक्ष्मी म्हात्रे, अनिता जयस्वाल, डॉ. अंशुजा किंमतकर, ज्योती कोल्हेपरा, सुरेखा माकडे, मेघा निरुडवार, ज्योती पडोळे, खुशबू इनवाते, श्रद्धा भोंडे प्रामुख्याने उपस्थित होते.
या आनंद मेळाव्यात खाद्य पदार्थांचे ४० स्टॉल लावून महिलांनी सहभाग घेतला. यात सर्व स्टॉल लावनाऱ्या महिलांना पारितोषिक वितरण करण्यात आले.तसेच महासंस्कृती महोत्सवात रांगोळी व मेहंदी स्पर्धेतील विजेते मिना चौधरी, प्रगती कापसे, प्रेरणा धमगाये, साक्षी धुरई, तृष्ठी चकोले, निशा पाठक, हर्षदा धनगर,निशा सरोदे, अंजली कतटुकाले,
येश्र्वर्या बोटरे, अंकिता इंनवाते, चेतना मनगटे व शिवाजी महाराज जीवनावरील गीतांवर नुत्य सादर करणाऱ्या कलाकारांना आमदार आशिष जयस्वाल यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.तसेच आ. आशिष जयस्वाल यांनी आनंद मेळाव्यातील सर्व स्टॉल ला भेट देऊन महिलांना प्रोत्साहित केले.