Thursday, December 26, 2024
Homeराज्यराजकारणात बंड केल्याशिवाय क्रांती घडत नाही - शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंढेकुंडलवाडी मार्केट...

राजकारणात बंड केल्याशिवाय क्रांती घडत नाही – शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंढेकुंडलवाडी मार्केट कमिटी निवडणुकीत महायुतीत फूट…

नांदेड – महेंद्र गायकवाड

राजकारणात बंड केल्याशिवाय क्रांती घडत नाही आमच्या उमेदवारानेही धोका देणाऱ्या भाजपविरुद्ध बंड केले असून त्यामुळे निश्चित आता मार्केट कमिटी निवडणुकीत क्रांती घडेल असे मत शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंढे यांनी बिलोली तालुक्यातील खपराळा येथे शिवसेना व राष्ट्रवादीच्या कुंडलवाडी मार्केट कमिटीच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत व्यक्त केले.

कुंडलवाडी मार्केट कमिटीच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट )व राष्ट्रवादी पक्षाने भाजप व काँग्रेसच्या विरोधात दंड थोपटले असून खपराळा येथील सटवाई मंदिरात नारळ फोडून शिवसेना व राष्ट्रवादीने आपल्या प्रचारास सुरुवात केली आहे.

या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख उमेश मुंढे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीपराप धर्माधिकारी, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे,बहुजन नेतृत्व मंगेशभाऊ कदम,शिवसेना तालूकाप्रमुख बाबाराव रोकडे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संभाजी मुकनर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कुंडलवाडी मार्केट कमिटी निवडणुकीत शिवसेनेचेचे अंकुश पाटील हिवराळे, राष्ट्रवादीचे रणजित पाटील हिवराळे हे काँग्रेस व भाजपच्या विरोधात निवडणूक लढवीत असून त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ खपराळा येथून करण्यात आला.

या प्रसंगी अशोक पाटील हिवराळे, माधवराव पाटील बोगरे,माधव हिवराळे,रामेश्वर पाटील हिवराळे,भास्कर पाटील कांगठीकर शिवसेनेचे रमेश पवनकर,शहराध्यक्ष श्रीकांत गादगे,निळकंठ दुडले यांच्यासह अनेक गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

महायुतीतील भाजप विरोधात शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र

महाराष्ट्रात सतेत असलेल्या महायुतीत कुंडलवाडी मार्केट कमिटी निवडणुकीत फूट पडली असून भाजपच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेना, राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा दिली नसल्याने महायुतीत फूट पडली आहे. सत्ताधारी भाजपला व्यापारी गटात उमेदवार मिळाला नसल्याने काँग्रेसच्या दोन जागा बिनविरोध निघाल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसला भाजपचा पाठिंबा आहे का.? असा सवाल शिवसेनेचे तालुका प्रमुख बाबाराव रोकडे यांनी केला आहे.

माजी आ.साबणेच्या दुटप्पी धोरणामुळे कार्यकर्ते नाराज

माजी आ.सुभाष साबणे हे भाजप व शिवसेना (शिंदे गट) हे दोन्ही पक्ष स्वतः चालवीत असल्यासारखे वागत असल्याची चर्चा खुद भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यातून होत आहे. साबणे यांनी आपल्या आदमपूर येथील एका कार्यकर्त्यास बिलोली मार्केट कमिटीत शिंदे गटातून उमेदवारी दिली आणि कुंडलवाडीत मात्र शिंदे गटाला डावलून शिवसेनेच्या जेष्ठ नेत्यांचे फोन सुद्धा उचलले नाहीत त्यामुळे साबणे हे दोन्ही पक्ष मीच चालवीत असल्याच्या तोऱ्यात वागत असून मुख्यमंत्री एकनाथ भाईच्या मी फार जवळचा असल्याचे भासवीत असल्याने कार्यकर्त्यातून नाराजीचा सुरु उमटत आहे. त्यांच्या दुटप्पी धोरणामुळे सच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: