बाळापूर – सुधीर कांबेकर
पारस ॲश बँड ते बाळापुर हायवे पर्यंत राखीच्या ओव्हरलोड गाड्यांमुळे रोडची दयनीय अवस्था झाली होती त्याकरता संजय शेळके यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या वतीने मुख्य अभियंता पारस यांना निवेदन देऊन रोड दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती परंतु अनेक दिवस झाल्यावर सुद्धा कामास सुरुवात होत नव्हती सदर विषयाची माहिती जिल्हाप्रमुख आमदार नितीन देशमुख यांना संजय शेळके यांनी दिल्यामुळे आमदार नितीन देशमुख यांनी या रोडच्या विषयांमध्ये जातीने लक्ष घालून पारस प्रकल्प अधिकाऱ्यांना काम करण्यास भाग पाडले व त्याचे टेंडर झाले कामास अंदाजे दीड वर्ष आधी सुरुवात सुद्धा झाली परंतु काम संत गतीने चालू होते त्याकरता सुद्धा आमदार नितीन देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत कित्येक वेळ बैठक लावून काम लवकरात लवकर पूर्ण करण्यास सुचविले दीड वर्षापासून रोडच्या संत गतीने चालू असलेल्या कामामुळे परिसरातील लोकांना प्रवास करीत असताना नाहक त्रास सहन करावा लागत होता शेवटी १ जुलै रोजी शिवसेना निवासी उपजिल्हाप्रमुख संजय शेळके यांनी व शिवसैनिक व परिसरातील नागरिकांनी संतप्त होऊन चार तास रास्ता रोको आंदोलन केले.
त्यावेळी आंदोलन स्थळी पोहोचलेले अधिकारी व ठेकेदारांना परिसरातील नागरिकांना दररोजच्या होणाऱ्या त्रासाचा व शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या त्रासाचा पाळा शेळके यांनी अधिकारी व ठेकेदारासमोर वाचल्यामुळे संबंधित अधिकारी व ठेकेदाराने एक महिन्याच्या आत काम पूर्ण करण्याच्या मागणी मान्य केल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले व त्यामुळेच रोडचे काम प्रगतीपथावर चालू असून १५ ते २० दिवसांमध्ये काम पूर्ण होण्याच्या मार्गावर दिसत असल्यामुळे परिसरातील या रोडने प्रवास करणारे नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.