Sunday, December 22, 2024
Homeराज्यशिवसेनेच्या वतीने जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी ३ डिसेंबरला रोजगार मेळावा - जिल्हाप्रमुख महेंद्र...

शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी ३ डिसेंबरला रोजगार मेळावा – जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांची माहिती…

सांगली – ज्योती मोरे

सांगली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींसाठी उद्योग व्यवसाय उभारणी करता शिवसेनेच्या वतीने नेमिनाथ नगर मधील राजमती भवनात 3 डिसेंबरला रोजगार मिळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी आज त्यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

दरम्यान या मेळाव्यात शासनाच्या विविध रोजगार निर्मिती योजनांचा लाभ घेता येणार आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यालया अंतर्गत बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे, तसेच सदर मेळाव्यात बेरोजगारांनी सहभाग घेऊन लाभ घ्यावा असे आवाहन चंडाळे यांनी केले आहे.

यावेळी विधानसभा प्रमुख समीर लालबेग, प्रमुख संदीप ताटे, योजना समन्वयक प्रवीण पाटोळे, श्रीमंत बासगी आदी मान्यवर उपस्थित होते.

Jyoti More
Jyoti Morehttp://mahavoicenews.com
मी ज्योती प्रभाकर मोरे, राहणार सांगली, मी गेल्या सहा वर्षांपासून बातम्यांची विश्वसनीयता जपणाऱ्या महा व्हॉइस या पोर्टलसाठी सांगली प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. शिवाय सांगलीमध्ये अनेक शॉर्ट फिल्म मध्ये अभिनय केला असून, केक या शॉर्ट फिल्म साठी बेस्ट ऍक्टरचे पारितोषिक प्राप्त केले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: