Monday, December 23, 2024
Homeराजकीयबुधगावातील घराघरात फुलणार कमळ शिवसेनेसह काँग्रेस राष्ट्रवादीचे १७ पदाधिकारी आमदार सुधीर गाडगीळ...

बुधगावातील घराघरात फुलणार कमळ शिवसेनेसह काँग्रेस राष्ट्रवादीचे १७ पदाधिकारी आमदार सुधीर गाडगीळ यांच्या उपस्थितीत भाजपात…

सांगली – ज्योती मोरे

सांगली विधानसभा मतदारसंघातील बुधगाव शहरातील घराघरात आता कमळ फुलणार यात आता शंका राहिलेले नाही, कारण आज बुधगाव मधील शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे 17 पदाधिकाऱ्यांनी आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलाय. दरम्यान शिवसेनेचे तालुकाप्रमुख गजानन मोरे, शिवसेना शहर प्रमुख सतीश मस्के ,माजी ग्रामपंचायत सदस्य सयाजीराव पाटील ,काँग्रेसने रमजान मुजावर काँग्रेसच्या आयोग सय्यद,

राष्ट्रवादीचे संतोष परदेशी, शिवसेनेचे राजू घाडगे, महेश माने, काँग्रेसचे उदय मोरे, काँग्रेस नेते झाकीर मुलाणी, शिवसेनेचे अनिल बिराजदार, सामाजिक कार्यकर्ते जोसेफ आचार्य ,काँग्रेसचे चंद्रकांत मोरे, शिवसेनेचे शाखाप्रमुख भालचंद्र पोतदार,शाखाप्रमुख अभय जगताप, प्रकाश परदेशी, मुकुंद गायकवाड आदींनाआमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह प्रदेश कार्यकारणी सदस्य शेखर इनामदार व स्थायी समिती सभापती धीरज सूर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे भाजपात स्वागत करण्यात आले.

यावेळी जयवंतराव पाटील, बाळासाहेब पाटील ,राजेंद्र शिवकाळे, विनायक शिंदे ,धनाजी पाटील, विवेक लुगडे ,बुधगाव शहर भाजपा अध्यक्ष संदीप गोसावी, सुखदेव गोसावी, दिलीप तारळेकर, विजय भाकरे, देवराज बागल,प्रकाश अदाते, शुभांगी कोळी, स्नेहल व्हणुगरे,अश्विनी म्हेत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: