गणेश तळेकर
जळगाव येथे कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली व त्याचप्रमाणे मराठा समाजातील महिलांचा अपमान व्हावा अशी वक्तव्य केली त्यावरून मराठा समाजामध्ये अतिशय रोष आणि संताप निर्माण झाला होता त्याची दखल घेऊन बकाले यांना निलंबित करण्यात आले होते. सदरची कारवाई ही अपुरी असल्याने मराठा समाजात त्याबाबतही असंतोष होता.
सबब शिवसंग्राम, मुंबईतर्फे आज मुंबई जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मा. मुख्यमंत्री श्री शिंदे साहेब यांना असे निवेदन दिले की, पो. निरीक्षक बकाले यांच्या वरती निलंबनाची केलेली कारवाई ही पुरेशी नसल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जावा व त्यांना अटक केली जावी. त्याचप्रमाणे त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे असे निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी शिवसंग्रामचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री विक्रांतजी आंबरे, मुख्य प्रवक्ते श्री प्रफुल्ल पवार, मुंबई कार्याध्यक्ष श्री विवेक सावंत, सांस्कृतिक विभाग अध्यक्ष श्री दीपक कदम, मुंबई जिल्हा उपाध्यक्ष श्री संतोष कदम, मुंबई सरचिटणीस शशिकांत शिरसेकर, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष श्री पुंडलिक मालुसरे,
दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष श्री योगेश विचारे, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष श्री विजय राणे, उत्तर मध्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष श्री विलास भोईटे, तालुकाध्यक्ष श्री राम भोईटे व धनु मंगेला, त्याचप्रमाणे स्व.विनायकराव मेटे साहेब यांचे भाचे श्री आकाश जाधव(युवानेते), श्री जगदीश मेहेर, श्री अनिल भेलसेकर इत्यादी उपस्थित होते.