Monday, December 23, 2024
Homeमनोरंजनशिवसंग्राम चित्रपट सांस्कृतिक विभागाच्या वतीने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ - नागपूर...

शिवसंग्राम चित्रपट सांस्कृतिक विभागाच्या वतीने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ – नागपूर ऑफिस ला निवेदन सादर…

मुंबई – गणेश तळेकर

शिवसंग्राम चित्रपट व सांस्कृतिक विभाग चे वतीने विदर्भ नागपूर येथे बैठक घेण्यात आली . शिवसंग्राम चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या विदर्भ अध्यक्षा श्री श्री राधिका उर्फ मंगलाताई ठक यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर ज्योती ताई मेटे महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष श्री तानाजीराव शिंदे सुप्रसिद्ध डायरेक्टर आणि शिवसंग्राम चित्रपट सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री दीपक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक घेण्यात आली.

या वेळी विदर्भातील नागपूर विभागाची व नागपूर जील्याचया काही लोकांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली सदस्य आदित्य कापसे , अविनाश अरोरा, लीना पाटील , निकिता पानतावणे , विद्या खोब्रागडे , कल्पेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली . सोबतच नागपूर मध्ये चित्रपट सृष्टीमध्ये काम करणाऱ्या लोकांना काय अडचणी येतात व चित्रपट सृष्टी मध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी काय मदत करता येईल या विषयावर चर्चा करण्यात आली.

नागपूर येथील चित्रपट महामंडळाचे ऑफिस फारच छोटे आहे आणि नागपूर विभाग हा फार मोठा आहे यासाठी ऑफिस पण मोठे असावे तसेच चित्रपट मंडळाचे सभासद कुठूनही ऑनलाईन कथा व गाणे म्हणजेच आपल लिखाण रजिस्टर करू शकले पाहिजे ती सुविधा ऑनलाई असावी असे विषय घेऊन आज नागपूर चित्रपट महामंडळाचे कार्यालयास भेट देवून त्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी नागपूर चे नवनियुक्त अध्यक्ष दीपक कटयारमल, कोष्याध्यक्ष अश्विनी धोटे , अतुल साखरे , आकाश मेश्राम यांनी उपस्थित राहून नियुक्त सभासंचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: