खामगांव – हेमंत जाधव
शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब याचे वाढदिवसा निमित्य शेतकरी शिवसैनिक श्रीराम खेलदार यांनी सोयाबीन व तुरीचा हार घालून मांडल्या शेतकऱ्याच्या व्यथा हिवरा बु ता खामगांव जी बुलढाणा येथील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी मातोश्रीचे निष्ठावंत शिवसैनिक श्रीराम राजाराम खेलदार यांनी मुंबई मातोश्री येथे भगवी शाल सोयाबीन व तूर याचेपासून बनवलेल्या हाराने सत्कार करून वाढदिवसा निमित्य संभाषण करून उध्दव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या श्रीराम खेलदार याचा साहेबां समोर झालेला संवाद पुढील प्रमाणे आहे.
उद्धव साहेब या देव माणसाने कोरोना काळात देशात एक नंबर मुखमंत्री म्हणून नाव लौकिक मिळवून जनतेच्या हृदयात स्थान मिळविले कोरोना काळात इतर राज्यातील मोठमोठ्या नद्या मृतदेहने भरलेल्या होत्या महाराष्ट्रात अशी कुठलीही घटना आढळली नाही आपली माणसं वाचवीण्या पलीकडे व जनतेला सुख सुविधा मिळण्या साठी मुंबई व महाराष्ट्र वाचविण्यासाठी साहेबांची धडपड होती.
कोरोना काळात शासनाच्या तिजोरीत एक रुपया नसताना शेतकऱ्यांना बिनशर्त कर्जमाफी केली उद्धव साहेब मुख्यमंत्रीअसतांना सोयाबीनला आठ ते नऊ हजार रुपये क्विंटल कापसाला बारा ते चौदा हजार रुपये क्विंटल भाव होता शेतकऱ्यावर आलेल्या नैसर्गिक आप्पती चक्रीवादळ संकटामुळे कोकणातील व संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भरपूर मदत मिळवून दिली मोठ्या प्रमाणात पिक विमा मंजूर करून शेतकऱ्याचा बँक खात्यात भरपूर पैसे टाकले कोरोनाच्या भयानक संकटानंतर उद्धव साहेबांमुळे शेतकऱ्यांची गाडी रुळावर आली होती या सरकारने शेतीमालाचे भाव कमी करून पुन्हा शेतकऱ्यांची थट्टा सुरू केलेली आहे निवडणुकीच्या अगोदर सोयाबीन काढायला येणार आहे.
जर का तुम्ही सोयाबीन व कापसाला तसेच शेतकऱ्यांचा मालाला हमी भाव दिला नाही तर शेतकरी तुम्हाला तुमची जागा दाखवतील असा इशारा शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करून दिला आहे पुन्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री व्हावे ही शेतकरी कष्टकरी जनतेची इच्छा आहे पुन्हा शिवसेनेचे सरकार येणार आहे कारण आतापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शेतकऱ्यांना हमी भाव बियाणे कीटकनाशके व रासायनिक खते यावरील व शेतकऱ्याच्या मालावर लावलेला जि एस टी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे वाढदिवसानिमित्त आपणास निरोगी दीर्ध आयुष्य मिळावे ही आई भवानी चरणी प्रार्थना करून साहेबाचे आशीर्वाद घेऊन भावना वक्त केल्या त्यावेळी साहेबांनी या शिवसैनिक शेतकऱ्याचे संभाषण ऐकून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत हे जाणून घेतले.