Monday, December 23, 2024
Homeराज्यअश्लील विभित्स चाळे करणाऱ्या भाजपाच्या किरीट सोमय्याच्या पोस्टरला शिवसैनिकांनी जोड्याने हाणले...

अश्लील विभित्स चाळे करणाऱ्या भाजपाच्या किरीट सोमय्याच्या पोस्टरला शिवसैनिकांनी जोड्याने हाणले…

नीच प्रवृत्तीच्या किरीट सोमय्याला गजाआड करा

भाजपाच्या सज्जनतेचा बुरखा फाटून अश्लील चेहरा समोर आला

रायगड – किरण बाथम

35 हून अधिक सेक्स कॅण्डलचा ॲक्शन हिरो व खऱ्या जीवनातील ब्लॅकमेलर व्हिलन किरीट सोमय्या चा व्हिडिओ व्हायरल होताच शिवसेना महिला आघाडीसह शिवसैनिक संतापाने पेटून उठले आहेत. किरीट सोमय्याच्या पोस्टरला शिवसेना महिला आघाडी व शिवसैनिकांनी पेण येथील कोतवाल चौकात जोड्याने हाणून आपला संताप व्यक्त केला.

नीम का पत्ता कडवा है किरीट सोमय्या भडवा है, महिलांशी अश्लील वर्तन करणाऱ्या किरीट सोमय्याचा निषेध असो, अटक करा अटक करा किरीट सोमय्याला अटक करा, किरीट सोमय्या हाय हाय अशा घोषणा देत शिवसैनिकांनी किरीट सोमय्या चा निषेध करून त्याला जेलमध्ये टाकण्याची मागणी केली.

महिलांशी अश्लील चाळे करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा ब्लॅकमेलर किरीट सोमयाच्या निमित्ताने भाजपाच्या सज्जनतेचा बुरखा फाटून अश्लील चेहरा जनतेसमोर आला आहे असे अनेक किरीट सोमय्ये भाजपमध्ये आहेत. असा आरोप उपजिल्हाप्रमुख अविनाश म्हात्रे व जिल्हा समन्वयक नरेश गावंड यांनी जोडे मारो आंदोलनाच्या वेळी केला.

किरीट सोमय्या चा नग्न अवस्थेतील व्हिडिओ टीव्हीवर पाहताना महाराष्ट्रातील महिलांना अक्षरशः डोळे मिटून घ्यावे लागले अशा नीच प्रवृत्तीच्या भाजपच्या किरीट सोमय्या विरोधात गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकण्याची हिंमत गृहमंत्री देवेंद्र फडवणीस दाखवतील का ? असा सवाल महिला दीपश्री पोटफोडे यांनी यावेळी केला.

 या जोडेमारो आंदोलनाला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अविनाश म्हात्रे, जिल्हा समन्वयक नरेश गावंड, महिला आघाडीच्या दीपश्री पोटफोडे, उपतालुकाप्रमुख भगवान पाटील, संतोष पाटील, शहर प्रमुख मयुरेश चाचड, चेतन मोकल, दिलीप पाटील, विजय पाटील, बाळू पाटील, नंदु मोकल, नरेश सोनवणे, नाम शिंदे, राजश्री घरत, महानंदा तांडेल, मेघना चव्हाण, छाया काईनकर, हिना कागदी, वैशाली समेळ, ज्योत्स्ना शिंदे, लहू पाटील, विशाल दोशी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: