खामगाव – हेमंत जाधव
मागील एक महिन्या पासून अटाळी सबस्टेशन अंतर्गत येणारे शहापूर,वहाळा,बोथा काझी,या गावत शेती पंपाला अंत्यत कमी दाबाने विदयुत पुरवठा होत असून शेती पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत असून विद्युत पंप सुद्धा जडून पंपाचे सुद्धा नुकसान झाले आहे. यासोबतच रब्बी पिक पेरणी धोक्यात आली आहे.
याबाबत वारंवार संबंधित वायरमन ला कळविले असता त्यांनी टाळाटाळ केली तसेच फोन बंद करून शेतकऱ्यांना त्रास देत असल्यामुळे आज MECB कार्यालय खामगाव येथे व उप कार्यकारी अभियंता श्री बाहेकर साहेब यांना निवेदन देन्यात आले.
निवेदन नमूद करण्यात आले की महाविद्युत वितरणचे लाईनमन मोरे व अटाळी सब स्टेशनचे इंजिनीयर घोंगे साहेब फोन उचलत नाहीत काम सुद्धा करत नाहीत दिवसभर एकदम होल्टेज कमी राहते. किंवा लाईन राहत नाही ज्यावेळेस थ्री फेज लाईट राहते त्यावेळेस पूर्ण दिवस फॉल्ट काढण्यात गमवतात जेव्हा लाईट दुरुस्त करतात तेव्हा थ्री फेज चा टाईम संपलेला असतो.
असा सर्व प्रकार मागील एक महिन्यापासून सुरू आहे. व ग्रामीण भागात सर्वांचे अशी कंप्लेंट आहे की कुठल्याच गावात स्वतः लाईनमन काम करत नाही त्यांनी सर्व कामे करण्याकरिता गावातील खाजगी व्यक्ती नेमून दिले आहेत. ती व्यक्ती परस्पर शेतकऱ्याकडून पैसे घेऊन कामे करतात पैसे न दिल्यास फॉल्ट काढत नाहीत लाईन सुद्धा चालू करत नाहीत आपण यामध्ये लक्ष देऊन आम्हास होल्टेज पूर्ण द्यावे व आमच्या गावात परमनंट लाईनमन द्यावा व एजंट बंद करण्यात यावे. व आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करू अशा स्वरूपाचे निवेदन बाहेकर साहेबांना देण्यात आले.
यावेळी उपस्थित शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री संजय भाऊ अवताळे, शिवसेना तालुका प्रमुख श्री राजू भाऊ बघे,युवा सेना तालुका प्रमुख अमोल फेरंग अनुसूचित जाती जमाती तालुकाप्रमुख नळेगाव सरपंच प्रकाश हिवराळे,सोशल मीडिया तालुका प्रमुख सोपान वाडेकर सोशल मीडिया उपतालुका प्रमुख सुरज ढोले, सागर मेतकर,प्रकाश भंडारी, मिलिंद तिडके,
लक्ष्मण मेतकर, गणेश मानकर, गणेश बदरखे मुरलीधर भुसारी, प्रमोद श्रीनाथ, प्रमोद टाले,गजानन बराटे,समाधान गावंडे, भीमराव हिवराळे, अशोक करंजकर, मनोज उकर्डे, विकास भगत,शेख मुनताज, गजानन भगत,खुशाल रिंढे, हरीश भगत इ.मोठ्या संख्येने शहापूर,बोथा काझी, वहाळा या तिन्ही गावचे शेतकरी उपस्थित होते.