Monday, December 23, 2024
Homeराज्यपातूर शहरात शिवजयंती महोत्सव उत्साहात साजरा...

पातूर शहरात शिवजयंती महोत्सव उत्साहात साजरा…

मिरवणुकी दरम्यान सादर केली पारंपारिक लोकनृत्य.

मिरवणुकीत दिसला सर्वधर्म समभाव.

महाराजांना दिली अश्व सलामी.

पातूर – निशांत गवई

शिवतीर्थ शिवाजीनगर लातूर येथे शिवजयंती निमित्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या जल्लोषात व महाराजांच्या जयघोषात साजरा करण्यात आला. या जयंती उत्सवात बाळराजांना पाळण्यात घालून शिवाजीनगर स्थित महिलांनी पाळणा गीते सादर केली तर उदय गवळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोवाडे सादर करून आई तुळजाभवानी च्या नावाने गोंधळ करून या जन्मोत्सवाचा उत्साह वाढवला या जन्मोत्सवा दरम्यान महिला व मुलींनी पारंपारिक नृत्य सादर करून बघायचे लक्ष वेधून घेतले होते यावेळी श्री खडकेश्वर व्यायाम शाळा पातुर ची दिगंबर उगले व श्रीकृष्ण फुलारी यांनी आपल्या व्यायाम शाळेतील विद्यार्थ्यांच्या मदतीने साहसीक खेळांचे प्रात्यक्षिके सादर केली.

तर बाळूभाऊ पोपळघट यांच्या मदतीने महाराजांना अश्वशनामी देण्यात आली व लहान मुलांनी लेझीम व झेंडा नृत्य सादर केली. यावेळी शिवशाही स्मारकाच्या उभारणीसाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा छत्रपती शिवाजी महाराज पंच मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी तुकाराम ढोणे,दीपक डोंगे, माजी नगरसेवक सचिन ढोणे,संतोष देवकर,बंटी बगळेकर राजेश इंगळे,संजय आवटे, महेंद्र ढोणे, पुरुषोत्तम इंगळे,गजानन तायडे,सतीश बगडेकर,

बाबुराव करंगाळे,ईश्वर पेंढारकर, मनोज पेंढारकर,दादाराव ढोणे,हर्षल ढोणे,नवीन करंगाळे यांची उपस्थिती होती. सार्वजनिक छत्रपती शिव जयंती उत्सव पातूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारका पासून मिरवणूकी ला सुरवात करण्यात आली मिवणुकी मध्ये वारकरी सांप्रदाय व श्री छत्रपती शिवाजी महाराज वेशभुषा,बँड पथक पारंपारिक वाद्य यामुळे मिरवणुकीची शोभा वाढली होती.

मिरवणुकी मध्ये पातूर शहरातील गावकरी व तसेच विविध मंडळांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज मिरवणुकी मध्ये उत्साहाने आपला सहभाग नोंदविला. त्यामध्ये श्री खंडकेश्वर व्यायम प्रसारक मंडळ, जय बजरंग फ्रेंड्स क्लब, हिंदू सेना, तपेहनुमान व्यायाम शाळा, हिंदुस्तानी फ्रेंडस क्लब,श्री सिदाजी म.व्यायम शाळा व पिंपळेश्वर व्यायम शाळा,

महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ, आईं तुळज भवानी मित्र मंडळ कसार वेटाळ, जय भवानी व्यायम शाळा, पातुरतील सर्व मंडळांनी सहभाग व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभुषा धारण करून सुरज क्षीरसागर व नील देवकर हे मिरवणुकीचे लक्ष ठरले.

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे वीर भगत सिंग मित्र मंडळाच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक शिव जयंती उत्सव समिती मिवणुक कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्या करिता श्री सिदाजी म.व्यायम शाळा ,पिंपळेश्वर व्यायम शाळा व मंगेश गाडगे मित्र परिवार यांनी अथक परीश्रम घेतले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: