मालेगाव (वाशिम) – चंद्रकांत गायकवाड
कुळवाडी भुषण, लोककल्याणकारी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती मालेगांव शहरात मोठ्या जल्लोषात व उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत शहरातील सर्व जातीधर्मातील नागरिक , महीला भगिनी तसेच विविध शाळांचे विद्यार्थी हजारोच्या संखेने सहभागी झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी दऱ्या- खोऱ्यातील गोरगरीब व सर्व जाती धर्मातील सवंगड्यांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली आणि कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना देखील सर्व जगाला आदर्श राहील अशा प्रकारचे स्वराज्य निर्माण केले. अशा या महान राजाची 394 वी जयंती मालेगाव शहरात प्रचंड उत्साहात साजरी करण्यात आली.
त्यानिमित्त काढण्यात आलेली शोभायात्रा मालेगाव नगरपंचायत पासून सुरुवात होऊन शिव चौक , जि .प. शाळा, खवले वेटाळ, माळी वेटाळ , कुटे वेटाळ , दुर्गा चौक ,जोगदंड दवाखाना त्यानंतर जुन्या बस स्टँडवरून मेडिकल चौक , मेन रोड ,गांधी चौक आणि त्यानंतर शिव चौकामध्ये विसर्जन करण्यात आले.
सकाळी दहा वाजता निघालेल्या शोभायात्रेमध्ये हॅपी फेसेस शाळा, बाल शिवाजी निकेतन व बाल विकास मंदिर शाळा या शाळेच्या विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींनी व शिक्षकांनी सहभाग नोंदवून त्यामध्ये लेझीम पथक ,तलवारबाजी, समुह नृत्य , लाठीकाठी आदी अविष्कार सादर केले. ते बघण्यासाठी शहरातील शिवभक्तांनी प्रचंड गर्दी केली होती. सकाळपासूनच मालेगाव शहरातील वातावरण शिवमय झाले होते.
या शोभायात्रेमध्ये रिसोड मतदार संघाचे आमदार अमित भाऊ झनक तसेच भारतीय जनता पार्टीचे युवा नेते नकुल भैया देशमुख, यांच्यासह बबनराव चोपडे , मधुकर काळे , गोपाल पाटील राऊत ,डॉ विवेक माने , जगदीश बळी, गजानन देवळे , अरुण बळी , शेख सईदभाई , शेख अयुबभाई , अली भाई , बाळा सावंत , आदी सर्वच पक्षातील मान्यवर सहभागी झाले होते. विशेषतः महिला वर्ग या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.
सहभागी शिवभक्तांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना अतिशय स्वादिष्ट मठ्ठा आणि थंडगार पाणी व्यवस्था अरविंद गोरे समाजसेवक यांनी केली होती. त्यानंतर पोहे व फराळाची व्यवस्था समाजसेवक जिवन टीकाईत यांनी केली होती. अतिशय जल्लोषात साजरी झालेल्या या शिवजयंती उत्सवामध्ये कोणत्याही प्रकारचा गुलाल तसेच फटाके आणि नाचण्यावर बंदी होती.
या शोभायात्रेला मुस्लिम, बौद्धधर्म बांधव तसेच हिंदू धर्मातील सर्वच जातीतील नागरिकांनी सहभाग नोंदवला होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ राजकुमार , अभिषेक मुंदडा, प्रा वसंतराव अवचार , प्रा भरत आव्हाळे, अॅड शंकरराव मगर,
रामदास काटेकर , प्रवीण पाटील, अनिल गवळी ,तेजराव जाधव, नागेश कव्हर , मनोज वाझुळकर, प्रशांत वाझुळकर, प्रविण अवताडे , शेषराव जाधव , दत्ता पोफळे ,पप्पू कुटे , जगन्नाथ रंजवे , आदी सह जिजाऊ ब्रिगेड च्या महिलांनी प्रचंड मेहनत घेतली .