Sunday, September 8, 2024
spot_img
Homeराज्यशितलवाडी ग्रा.पं. उपसरपंचपदी प्रज्वल गेचुडे यांची निवड...

शितलवाडी ग्रा.पं. उपसरपंचपदी प्रज्वल गेचुडे यांची निवड…

शितलवाडी ग्रा.पं. मध्ये सरपंच, उपसरपंचांनी स्विकारला पदभार

रामटेक – राजू कापसे

रामटेक तालुक्यातील महत्वाची माणली जाणारी तथा आर्थिक दृष्टीकोनातुन बळकट असलेल्या ग्रामपंचायत शितलवाडी येथे आज दि. २७ डिसेंबर ला उपसरपंच पदाची निवड शांततेत पार पडली.

यात प्रज्वल क्रिष्णाजी गेचुडे यांची उपसरपंच पदी बहुमताने निवड करण्यात आली. यावेळी शाशकीय अधिकारी म्हणुन पंचायत समीती येथील कृषी अधिकारी धनराज खोरगे व ग्रामविकास अधिकारी मंगेश गिरमकर यांनी काम पाहिले.
सकाळी १० वाजतापासुन निवड प्रक्रियेला सुरुवात झाली होती.

दरम्यान दुपारी २ ते ४ दरम्यान गुप्तमतदान पार पडले. यावेळी ३ उमेदवार उपसरपंच पदासाठी रिंगणात होते. पैकी दोन उमेदवारांना ८ – ८ असे सारखे मत पडले तर तिसर्‍याला शुन्य मत पडले. तेव्हा सरपंचांना दोन मताचा अधिकार असल्याने नवनियुक्त सरपंच सौ. जयश्री पपीश मडावी यांनी आपल्या दुसऱ्या मताचा वापर करून प्रज्वल क्रिष्णाजी गेचुडे यांना विजयी केले.

निवड प्रक्रिया आटोपताच गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला. यावेळी उपस्थितांमध्ये नवनियुक्त सरपंच सौ जयश्री पपीश मडावी, नवनियुक्त उपसरपंच प्रज्वल कृष्णाजी गेचुडे, सदस्य दिशा बालपांडे , सौ नलिनी पराते , वैशाली सावरकर , प्रभा देवडगले , श्री किशोर सहारे , वनीता कोडवते यांचेसह डॉक्टर पपीश मडावी , धर्मेश भागलकर , गजू बिसेन,

संजय बिसेन, राजकुमार गायकवाड , विनोद सावरकर , मदन सावरकर , अमोल बालपांडे , दामोदर पराते , नितीन देवडगले , प्रभाकर मेहकुले , राजू कापसे , गेडामजी , नितीन कापसे , कवडू कोकोडे , बाळकृष्ण वाडीवे , शुभम गेचुडे , पंकज बालपांडे आदी. उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: